BIG NEWS : सोलापूर-पुणे महामार्गावर फ्रीज वाहतूक करणाऱ्या कंटेनरला भीषण आग

123

सोलापूर-पुणे महामार्गावर चौफुला ता. दौंड हद्दीत फ्रीज वाहतूक करणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या बंबानी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले.

चेन्नई येथून मुंबईकडे ६० सॅमसंग कंपनीचे फ्रीज, वॉशिंग मशीन भरून कंटेनर क्रमांक (एमएच१२ एसएक्स ८०१९) हा सोलापूर-पुणे महामार्गाने मुंबईकडे जात होता. कंटेनर चौफुल्याजवळ आला असता कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.

हेही वाचा : आजचे राशीभविष्य ; आपल्या राशी साठी कसा असणार आजचा दिवस …

चालकाने कंटेनर महामार्गाच्या कडेला घेतला. यानंतर कुरकुंभ एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंब येईपर्यंत आग मोठ्याप्रमाणात भडकली होती. पाण्याचा मारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मात्र लागलेल्या आगीत फ्रीजचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही. यवत पोलीस पथकाने सोलापूर-पुणे लेनवरची वाहतूक बंद करीत सेवा रस्त्यावरून वळवली होती.

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कंटेनर महामार्गावरून बाजूला केल्यानंतर सोलापूर-पुणे महामार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली.