सत्तासंघर्षाच्या न्यायालयातील सुनावणी नंतर आता ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. शिवसेना आणि ठाकरे गट यांच्याकडून पक्ष वाढीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
PUNE NEWS: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक VIDEO
अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक बोलवलेली असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखाने ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
तुम्हाला YOUTUBE वरील ADS चा त्रास होतो? अशा प्रकारे करा ब्लॉक; काही मिनिटांत होईल सुटका
उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा, विधानसभा यांच्यासह महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गटाने ही बैठक बोलावल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. या बैठकीपूर्वीच पुणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे देखील उपस्थित होते.
महेश पासलकर हे ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आहेत. तसेच वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे ते अध्यक्षही आहेत. पासलकर हे अत्यंत संघर्षातून जिल्हाप्रमुख पदावर पोहोचले होते.
PUNE NEWS : पुण्यात तुफान हाणामारी…कारण ऐकाल तर तुम्हीही चक्रावाल
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे.
झेरॉक्सचं दुकान दाखवतो म्हणत प्रवाशासोबत भयानक कांड; नागरिकांमध्ये दहशत, वाचा नेमकं काय घडलं?
या बैठकीत पुढील निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहीती आहे.