BIG NEWS : अवैधरित्या पेट्रोल-डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश; हडपसर पोलीसांनी २, कोटी २८ लाख रु. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

120
अवैधरित्या पेट्रोल / डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश

BIG NEWS : हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल / डिझेल चोरीचे अनुषंगाने वपोनि अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांनी तपास पथक तसेच पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी यांना हजेरीवर सूचना दिलेल्या होत्या.

त्याचे अनुषंगाने हडपसर तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, मनोज सुरवसे, अमोल दणके, रशिद शेख असे दि. ०८/०४/२०२३ रोजी पहाटे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “लक्ष्मी कॉलनी, गजानन मित्र मंडळाळजवळ, १५ नंबर चौक, हडपसर पुणे.” येथे वाशी नवी मुंबई येथून एटीफ पेट्रोल (विमना करीता वापरण्यात येणारे पेट्रोल) डिझेल भरून टँकर शिर्डी एअरपोर्ट कडे जाणार आहेत.

सदरचे टँकर हे कंपनी कडुन प्रवासाचा मार्ग वेळ नियोजीत केलेली असताना तसेच सदर टँकर मधील इंधन बाहेर काढता येवु नये या करीता कंपनीने अॅटो लॉक व सील केलेले असते असे असताना काही इसम हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, रिलायन्स च्या गाडीमधून प्लॉस्टीक कॅन्डमध्ये अवैधरित्या पेट्रोल व डिझेल या ज्वलनशील इंधनाची चोरी करीत आहेत वगैरे बातमी मिळाल्याने सदर बाबतची माहीती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांना कळवून, त्यांचे आदेशान्वये सदर घटना ठिकाणी सकाळी ०६/३० वा चे सुमारास छापा टाकला असता.

सदर ठिकाणी दोन एचपीसीएल कंपनीचे टँकर मधील वॉल बॉक्स मधुन इंधन काढताना व सदर ठिकाणी इंधनाने भरलेले १४ प्लॅस्टीकचे कॅन मिळून आले. त्यामुळे सदरबाबत पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी सबंधित एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन समक्ष बोलावून घेतले.

सदर ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी तात्काळ भेट दिली, सदर घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर- ५५४ / २०२३ भा.द.वि. कलम- ३७९, २८५, ३४ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून.

सदरील अवैध रित्या पेट्रोल ची चोरी करणारे इसमांची नावे १) सुनिलकुमार प्राननाथ यादव वय २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या लक्ष्मी कॉलनी, दत्त मंदिराजवळ, हडपसर पुणे. मुळ राहणार काछा पूरेबोधराम का पुरवा, पोस्ट- दूल्हेपूर काछा, दुल्हेपूर प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश २) दाजीराम लक्ष्मण काळेल वय ३७ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या विठ्ठलनगर, दुर्वाकुर पार्क, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. वळई ता. माण, जि. सातारा ३) सचिन रामदास तांबे वय ४० वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. व ४) शास्त्री कवलु सरोज वय ४८ वर्षे, धंदा- मजुरी, राहणार- सध्या १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. हे इसम नामे ५) सुनिल रामदास तांबे वय अंदाजे ३८ वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. यांचे सांगणेवरुन आम्ही टँकरमधून पेट्रोल चोरी करीत असल्याचे सांगितले. हडपसर पोलीसांनी सदर ठिकाणाहून पेट्रोल/ डिझेल चोरी करण्याचे साहित्य ०८ पेट्रोलचे टँकर, १४ पेट्रोल कॅण्ड, इलेक्ट्रिक मोटारपंप वगैरे एकुण किंमत रुपये २,२८,०५, ९९५ /- “ ( दोन कोटी अठ्ठाविस लाख पाच हजार नउशे पचांनो रु) चा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठाचे आदेशान्वये सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे साो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे साो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, मनोज सुरवसे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, रशिद शेख, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, कुंडलीक केसकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.