भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ बहुरूपधारिणी ‘ या सांगीतिक  कार्यक्रमाचे आयोजन दि.११ मे  २०२४ रोजी   करण्यात आले आहे.मराठी भाषेचा प्रारंभापासून प्रवास या कार्यक्रमातून  सादर केला जाणार आहे.निर्मिती,लेखन,निवेदन डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे.संगीत संयोजन अनुप कुलथे यांचे असून गिरीश दातार,गौरी देशपांडे हे अभिवाचन करणार आहेत.मंजिरी जोशी,प्रणव कुलकर्णी हे गायन करणार आहेत.प्रकाश सुतार(कीबोर्ड),रोशन चांदगुडे(तबला),धनंजय साळुंखे(तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत.

हा कार्यक्रम शनिवार, दि.११ मे    २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०५ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे  ही माहिती दिली.