गेल्या अनेक दिवसापासून अश्या काही घटना घडत आहेत, ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. मीरा रोड येथे अशीच एक घटना घडली आहे, ज्यामुळे ही घटना श्रद्धा केसची पुनरावृत्ती आहे असे म्हटले जात आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची अगदी निघृण पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे. आरोपी मृतदेहाचे बारीक तुकडे करायचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो वेग वेगळे प्रयत्न करायचा.
या घटनाप्रकरणी 56 वर्षीय आरोपीवर हत्या प्रकरणी नयना नगर पोलीस ठाण्यात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे वय फक्त 32 वर्ष होते. हे दोघे ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मिरा रोड येथे राहायचे.
गीता नगरच्या सातव्या मजल्यावर हे दोघे राहायचे परंतु बुधवारी घरातून दुर्गंधी येत असल्याकारणाने शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला व यासंदर्भात कळविले. प्रत्यक्ष घटना स्थळी आल्यानंतर दाराला कुलूप होते. कुलूप तोडल्यानंतर जे घडलेले पाहिले ते दृश्य भयानक होते. पोलिस आले तेव्हा सर्वांना या घटनेचा खुलासा कळाला.
आरोपी मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये या तुकड्यांचे बारीक पावडर बनवून तो गटारामध्ये टाकायचा. शरीराचे तुकडे करण्यासाठी हा आरोपी कटर मशीनचा वापर करायचा. या सर्व कृत्याची माहिती स्वतः आरोपीने दिलेली आहे.
ही घटना दोन दिवसापूर्वी घडलेली आहे. हत्यासाठी आरोपीने वापरलेले सर्व साहित्य पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत तसेच आरोपीला अटक देखील करण्यात आलेले आहे. घडलेल्या या प्रकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.