“बाल शिवाजी” चित्रपटाचा टिझर झाला रिलीज, आकाश ठोसर दिसेल नव्या भूमिकेत, लूक पाहून व्हाल थक्क!

10

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर विविध कलाकृती साहित्य सादर करण्यात आलेल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट देखील बनलेले आहे तसेच अनेक अभिनेत्यांनी महाराजांची भूमिका देखील साकारली आहे व या सर्व भूमिकांना प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे परंतु सर्व प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

लवकरच बाल शिवाजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झालेला आहे. या चित्रपटांमध्ये महाराजांची भूमिका चक्क सैराट फेम आकाश ठोसर करत आहे. अभिनेता आकाश ठोसर आपल्या सर्वांना माहिती आहे. आकाश ने चित्रपट सैराट मधून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले परंतु अभिनेता आकाश आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे “बाल शिवाजी”. बाल शिवाजी रूपाने आपल्याला आकाश मोठ्या पडद्यांवर पुन्हा पाहायला मिळणार आहे.

चित्रपट सैराट नंतर बाल शिवाजी चित्रपट आकाशला मिळालेली सर्वात मोठी संधी आहे आणि या चित्रपटात तो उत्कृष्ट अभिनय करून आपले कला गुण दाखवेल या कोणत्याही प्रकारची शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या चित्रपटाबद्दल खुद्द रवी जाधव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट शेअर केलेली आहे. ravijadhavofficial हे रवी जाधव यांचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट आहे.

रवी जाधव यांनी जी पोस्ट शेअर केलेले आहे त्यामध्ये आपल्याला मोशन टीझर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, मावळे, गड, लढाई आणि भगवा झेंडा दिसत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकांच्या पसंतीच उतरेल अशी देखील अशा व्यक्त करत आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच हजारो चाहत्यांनी पोस्टला लाईक आणि कमेंट केलेले आहे. अनेकांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्याची उत्सुकता देखील लागलेली आहे.