पुणे : अॅक्सिस बँक ही भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असून बँकेने वरले, पुणे येथे नुकतेच ग्रामीण शाखेचे उद्घाटन केले. बँकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. शरद बुट्टे पाटील – माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य, पुणे आणि श्री. दत्तात्रय मांडेकर- माजी सरपंच, आंबेथान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅक्सिस बँकेचे प्रतिनिधी – श्रीमती सृष्टी राजन नंदा, परिमंडळ प्रमुख – पुणे, श्री. अनंत विश्वासराव चौधरी, क्लस्टर प्रमुख – पिंपरी, श्री. निलेश महाजन, परिमंडळ व्यवस्थापक – भारत बँकिंग, श्री. सुरज चन्नापटनम, शाखा प्रमुख, वरले उपस्थित होते.
नवी शाखा तळमजला, शॉप क्रमांक ११ आणि १२, सी- बिल्डिंग, रोशन वन, वरले, चाकण, पुणे येथे वसलेली आहे.
नव्या शाखेच्या लाँचमुळे या वंचित भागात सेवा देणारी अॅक्सिस बँक ही खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील पहिलीच बँक ठरली आहे. या शाखेच्या माध्यमातून अॅक्सिस बँक पश्चिम भागाचा विकास आणि विस्तारासाठी हातभार लावणार आहे. त्यासाठी बँकेतर्फे सुवर्ण कर्ज, शेती कर्ज, शेती उपकरण कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, खेळत्या भांडवलासाठी कर्ज, टर्म कर्ज अशाप्रकारची सर्वसमावेशक उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याशिवाय ठेवी उत्पादने म्हणजे बचत खाते, करंट खाते, निश्चित ठेवी अशा सुविधाही या भागातील नागरिकांना दिल्या जाणार आहेत.
शाखेच्या उद्घाटनाविषयी अॅक्सिस बँकेच्या भारत बँकिंग विभागाचे समूह एक्झक्युटिव्ह आणि प्रमुख मुनीश शारदा म्हणाले, ‘अॅक्सिस बँकेसाठी ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत. सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेच्या धोरणाला अनुसरत या बाजारपेठांतील विकासाला हातभार लावण्यास आमचे प्राधान्य आहे. या नव्या शाखेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवणे आणि या भागातील ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार आहे. बँकेच्या निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये मिळून २२६५ पेक्षा जास्त शाखा आहेत. आमच्या दिल से ओपन या तत्वाशी सुसंगत राहात ग्राहकांना सेवा देण्याचे आणि देशभरात अशा नव्या शाखा सुरू करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे
या भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अॅक्सिस बँकेतर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये रेफरल ड्राइव्हज, जीएसटी ड्राइव्ह्ज, लीफलेटचे वाटप, प्रादेशिक प्रदर्शनांमध्ये सहभाग, स्पर्धा यांचा समावेश आहे. बँकेतर्फे कर्ज मेळा, इतर प्रादेशिक उपक्रम आणि मंडईमध्ये जागरूकता उपक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.