अनेक ठिकाणी धरणातील पाणी आटलेले चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला पावसाची आतुरता लागलेली आहे. कधी पाऊस पडेल आणि धरणातील पाणी साचून पाण्याची पातळी वाढेल, अशी प्रत्येक जण वाट पाहत आहेत. पुण्यातील अनेक धरणे रिकामी झालेली आहेत. धरणातील पाणी आटलेले आहेत. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये देखील असेच एक चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
भोर तालुक्यामध्ये भाटघर नावाचे धरण आहे. या धरणातील पाणी पूर्णपणे आटलेले आहे तसेच या धरणातील पाणी आटल्याने या धरणात असलेले पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आलेले आहे. सध्याच्या परिस्थितीत या धरणात केवळ सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. असे असल्याने या धरणात गुप्त व लुप्त असलेले पांडवकालीन मंदिर लोकांना दिसू लागले आहे. हे मंदिर दिसताच लोकांची दर्शन घेण्यासाठी रांगच लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे.
या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात असलेले कांबरे गावातील पांडवकालीन कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आले आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहेत. पाण्याखाली गेलेले हे एक प्राचीन मंदिर मानले जात आहे. धरणातील पाणी आटल्यामुळे हे मंदिर वर आले आहे. हे मंदिर पाहण्यासाठी भक्तजन तसेच संशोधक यांची भली मोठी रांग लागलेली आहे.
अनेकजण या मंदिराचा इतिहास व पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.
धरणातील पाणी आटल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ होत असली तरी पुणेकरांचा इतिहास मात्र पुन्हा नव्याने वर येत आहे, असे देखील स्थानिक नागरिकांकडून म्हटले जात आहे.
पांडवकालातिल