पंख्याला लावा चपातीचे पीठ, धूळ कधीच होणार नाही जमा, हवा इतकी येईल की एसीची हवा सुद्धा फिकी पडेल!

56

घरामध्ये गृहिणी मंडळी वेगवेगळ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. असाच एक उपाय केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चपातीच्या पिठाचा वापर पंख्यावर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओवर वेग- वेगळ्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत.

आपल्यापैकी अनेकांनी गव्हाच्या पिठापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ पाहिले असतील. गव्हाच्या पिठापासून आपण चपाती, पुरी, पराठे आणि बरंच काही बनवत असतो परंतु हे पीठ तुम्ही पंख्याला देखील लावू शकता असा विचार कधी केलेला आहे का? नाही ना..तर भविष्यात तुम्ही देखील चपातीच्या पिठाचा वापर पंख्याला लावू शकता. हा जुगाड एका गृहिणीने केलेला आहे,असे केल्याने तुम्हाला तीन ते चार महिने त्रासापासून सहज सुटका मिळू शकते.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, घरातील महिलांकडे सगळ्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे काही ना काही मार्ग असतात. अगदी छोट्या छोट्या पद्धतीतून घरातील गृहिणी मंडळी समस्येतून वाट काढत असतात, अशीच वाट एका गृहिणीने काढलेली आहे. वारंवार पंख्यावर जमा होणारी धूळ काढण्यासाठी चक्क चपातीच्या पिठाचा वापर करून या महिलेने पंखा साफ केलेला आहे.

यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये चपातीचे पीठ घ्यायचे आहे. पाण्याचा वापर न करता तेलाचा वापर करायचा आहे आणि कणिक व्यवस्थित मळायची आहे. आता आपल्याला कणकेचा गोळा पंख्यावर फिरवायचा आहे, असे केल्याने पंखावर जमा झालेली धूळ पिठाला लागेल. आता आपल्याला स्वच्छ कपड्याने पंखा पुसायचा आहे, असे केल्याने पुढील चार ते पाच महिने तुम्हाला धुळीचा कोणता त्रास होणार नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा सोशल मीडियावर अवश्य पहा.