अक्षय्य तृतीयेनिमित्त फोनपेतर्फे  कॅशबॅक ऑफरची घोषणा

पुणे मे २०२४: फोनपे या भारतातील आघाडीच्या फिनटेक प्लॅटफॉर्मने या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या आनंददायी आणि सणासुदीच्या प्रसंगी आज आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. १० मे २०२४ रोजी, युजर फोनपे ॲपवर १००० रुपयाच्या किमान ऑर्डर मूल्यावर २००० रुपयांपर्यंतचा खात्रीशीर कॅशबॅक घेऊ शकतात. ही युनिक ऑफर केवळ फोनपेवर उपलब्ध असून, केवळ २४ कॅरेट डिजिटल सोन्याच्या वन टाइम खरेदीवर लागू आहे. युजर युपीआय , युपीआय लाईट , क्रेडिट आणि डेबिट कार्ड, वॉलेट आणि गिफ्ट कार्ड यांसारख्या पेमेंटच्या अनेक पद्धतींद्वारे पैसे देणे निवडू शकतात.

सणासुदीच्या आनंदात भर घालण्यासाठी, फोनपेकडे १२ मेपर्यंत कॅरेटलेन स्टोअर्सवर डिजिटल सोन्याची पूर्तता करण्यासाठी विशेष ऑफरदेखील आहे. या ऑफरमध्ये सोन्याच्या नाण्यावर अतिरिक्त २ टक्के सूट, अनस्टडेड दागिन्यांवर अतिरिक्त ४टक्के सूट, स्टडेड दागिन्यांवर अतिरिक्त १० टक्क्यांपर्यंत सूट आहे. फोनपे कॅरेटलेन, सेफगोल्ड आणि एमएमटीसी -पीएएमपी  डिजिटल सोने इकोसिस्टममधील काही आघाडीच्या आणि विश्वासार्ह प्लेअर्सकडून सर्वोच्च शुद्धतेचे सोने ऑफर करते. 

ग्राहक फोनपेवर भागीदारांनी ऑफर केल्यानुसार ९९.९९% शुद्धता प्रमाणित २४ कॅरेट  डिजिटल सोने खरेदी करू शकतात.ग्राहक त्यांच्या घरातील २४*७ आरामात डिजिटल सोने खरेदी करू शकतात. त्यांचे साठवलेले सोने केव्हाही विकल्यावर, ४८ तासांच्या आत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.डिजिटल पद्धतीने खरेदी केलेले प्रमाणित २४ कॅरेट सोने शून्य मेकिंग शुल्क घेते आणि ते मोफत बँक-ग्रेड सोने लॉकर्समध्ये साठवले जाते.कोणत्याही रकमेसह गुंतवणूक करा: ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रकमेसह डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता आहे.

वन टाइम करण्याव्यतिरिक्त फोनपे प्रत्येक भारतीयाला एसआयपी  द्वारे सोन्यात डिजिटल गुंतवणूक करण्याचे सामर्थ्य देते आणि ग्राहकांना दीर्घकालीन, पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यास मदत करते. भारतातील १९ हजारांहून अधिक  पिनकोडमधील १  कोटींहून अधिक ग्राहकांनी आतापर्यंत फोनपे प्लॅटफॉर्मवर पारदर्शक किमतीत उच्च शुद्धतेचे २४ कॅरेट  सोने खरेदी केले आहे आणि याद्वारे त्यांचा ब्रँडवरील प्रदीर्घ विश्वास दिसून येतो.