शाओमी इंडिया या देशातील आघाडीच्या स्मार्टफोन ब्रॅण्डने आज त्यांच्या लोकप्रिय रेडमी ए-सिरीज पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स -रेडमी ए२ आणि रेडमी ए२+च्या लाँचची घोषणा केली.
मेड-इन-इंडिया स्मार्टफोन्स किफायतशीर किमतीत दर्जात्मक वैशिष्ट्यांसह एकसंधी ग्राहक अनुभव देतात, ज्यामुळे हे स्मार्टफोन्स वापरकर्त्यांसाठी परिपूर्ण निवड आहेत.
शक्तिशाली प्रोसेसर, मोठे डिस्प्ले व विशाल ५,००० एमएएच बॅटरी असलेली रेडमी ए२ सिरीज जनतेला सर्वोत्तम प्राइस-टू-परफॉर्मन्स रेशिओ देते, ज्यामधून अर्थपूर्ण अपग्रेड्सचा शोध घेत असलेल्या भारतीय ग्राहकांचा विश्वास दिसून येतो.
जवळपास २.२ हर्ट्झसह ऑक्टो-कोअर हेलिओ जी३६ प्रोसेसरआणि ६.५२ इंच एचडी मोठे डिस्प्ले असलेली रेडमी ए२ सिरीज अँड्रॉईड १३ वर आधारित आहे, एकसंधी ब्राऊजिंग व मल्टीमीडिया वापराचा अनुभव देण्यासोबत वापरकर्त्यांना सुलभ सॉफ्टवेअर अनुभव देखील देते.
सुरक्षित अनुभवासाठी रेडमी ए२+ मध्ये सुपरफास्ट फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे, ज्यामधून स्मार्टफोन सुरक्षितपणे अनलॉक होण्यासाठी अतिरिक्त सुरक्षिततेची खात्री मिळते.
या लाँचबाबत सांगतानाशाओमी इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी अनुज शर्माम्हणाले, ‘‘ब्रॅण्ड म्हणून आम्ही देशाच्या तरूणांना सक्षम करण्याच्या प्रबळ मनुसब्यासह सर्वांना नवोन्मेष्कार उपलब्ध करून देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाप्रती नेहमी काम केले आहे.
हेही वाचा :वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलला बोलावणे पडले महागात, कासारवाडीतील बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल
आजचे लाँच ग्राहकांसाठी सुलभ परिवर्तनाला चालना देण्याकरिता शाओमीच्या अनेक प्रयत्नांपैकी एक आहे, जेथे ग्राहक आधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब करण्याप्रती वाटचाल करत आहेत.
नवीन रेडमी ए२ सिरीजमध्ये अर्थपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि आम्हाला आशा आहे की, नवीन तंत्रज्ञानामध्ये अपग्रेड करण्याची इच्छा असलेल्या मूल्यासंदर्भात जागरूक ग्राहकांना आमच्या नवीन ऑफरिंग्जमध्ये किफायतशीर दरात सर्वोत्तम सोल्यूशन्स मिळतील.
रेडमी ए१ सिरीजच्या यशाला अधिक पुढे घेऊन जात आणि रेडमीच्या क्वॉलिटीच्या पाठबळासह आम्हाला रेडमी ए२ सिरीजला देखील मोठे यश मिळण्याचा विश्वास आहे. हे स्मार्टफोन्स प्रगतीशील डिजिटल भारतच्या आमच्या संकल्पाला अधिक दृढ करण्याप्रती आमच्या प्रयत्नामधील आणखी एक ऑफरिंग आहेत.’’
पुण्याचा विकास : आठपदरी मार्गावर 17 उड्डाणपूल, 5 बोगदे ! पहा पीएमआरडीए रिंगरोडचा “मेगा प्लॅन’…
शाओमी स्मार्टफोन्स दर्जाचा सर्वोच्च मानक राखण्यामध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत आणि प्रत्येक डिवाईससह विश्वसनीयतेची खात्री घेतली जात आहे.
रेडमी ए२ सिरीजसह ग्राहकांना उच्च दर्जाची वैशिष्ट्ये असलेला सर्वोत्तम डिवाईस मिळण्यासोबत दुप्पट गतीचे पाठबळ असलेल्या उद्योगातील २ वर्षांच्या सर्वोच्च वॉरंटी कालावधीसह ‘रेडमी का डबल भरोसा’चे वचन देखील मिळते.
तसेच दीर्घकाळापर्यंत स्मार्टफोन कार्यरत राहण्यासाठी आणि सर्विसेबल क्वॉलिटीचे उच्च मानक सक्षम करण्यासाठी हे डिवाईसेस भारतभरातील१०० टक्के ठिकाणी१५०० हून अधिक सर्विस सेंटर्सपर्यंत सुविधा देतात.
ज्येष्ठ नागरिक १८०० १०३ ६२८६ या क्रमांकावर विनंती करत किंवा ८८६१८२६२८६ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पावत विशेष ‘अॅट-होम सर्विस’चा लाभ घेऊ शकतात.
किंमत व उपलब्धता : रेडमी ए२+ ४ जीबी + ६४ जीबीव्हेरिएण्टमध्ये८,४९९ रूपयेकिंमतीत उपलब्ध असेल.रेडमी ए२तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल:२ जीबी + ३२ जीबी व्हेरिएण्ट, किंमत ५,९९९ रूपये; २ जीबी + ६४ जीबी व्हेरिएट, किंमत ६,४९९ रूपये आणि ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएण्ट, किंमत ७,४९९ रूपये; आयसीआयसीआय बँक कार्डधारक देखील या डिवाईसेसच्या खरेदीवर जवळपास ५०० रूपयांच्या अतिरिक्त त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात.
डिवाईसच्या विक्रीला२३ मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजताAmazon.in, Mi.com,एमआय होम्सवर आणि सर्व रिटेल पार्टनर्सकडे सुरू होईल.