एमजी मोटर्स कडून ‘ॲडव्हान्स्ड ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्म’ बाजारात

19

पुणे : एमजी मोटर इंडिया या ब्रिटिश ऑटोमोबाइल ब्रॅण्डने एमजी ग्लॉस्टरची ॲडव्हान्स्ड ब्लॅकस्टॉर्म आवृत्ती आज बाजारात आणली. ही भारतातील पहिली स्वायत्त लेव्हल- १ प्रीमियम एसयूव्ही आहे. ही एकमेव विशेष आवृत्ती दिमाखदार काळ्याशार रंगात घडवलेली आहे. ह्यामुळे वाहनाला वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त झाले आहे. ॲडव्हान्स्ड ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्म देशभरात  ४०,२९,८००/- रुपये एवढ्या एक्स-शोरूम (दिल्ली) किमतीला उपलब्ध होणार आहे.

ॲडव्हान्स्ड ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्म ही गाडी तिच्या बहुआयामी सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. २ डब्ल्यूडी आणि ४ डब्ल्यूडी, न्यू ग्लोस्टर आणि इंटरनेट इनसाइड ही गाडीची ओळख असलेली चिन्हे मेट्ल ब्लॅक आणि मेट्ल ॲश ह्या रंगांत ठळक करण्यात आली आहेत. रूफ रेल, धुरकट काळे टेललाइट्स, खिडक्यांच्या भवतालचे भाग, फेण्डर आणि फॉग गार्निश आदी भागांतही काळा रंग (डार्क थीम) वापरण्यात आला आहे. त्याची परिणती म्हणून एमजीच्या ह्या फ्लॅगशिप एसयूव्हीचे एकंदर स्वरूप आक्रमक झाले आहे. ॲडव्हान्स्ड ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्मच्या आतमध्ये अंतर्गत रचनाही काळ्या रंगात आहे. त्याला पूरक ठरतील अशा लाल रंगाच्या छटा स्टीअरिंग व्हील, हेडलॅम्प्स, कॅलिपर्स तसेच पुढील व मागील बम्पर्सवर वापरण्यात आल्या आहेत. लेदरची गडद रंगातील अपहोल्स्टेरी आसनांसाठी वापरण्यात आली असून, तिला लाल रंगांने टाके घातलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण अंतर्गत रचनेला एक रांगडे स्वरूप आले आहे.

एमजी मोटर इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता ह्या लाँचबद्दल म्हणाले, “एमजी ग्लॉस्टर आराम, लग्झरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या एका कालातीत प्रतिकाचे प्रतिनिधित्व करते. हा वारसा आणखी एका पावलाने पुढे नेत ॲडव्हान्स्ड ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्म अधिक आत्मविश्वास आणि निश्चयी दणकटपणाचे दर्शन घडवते. अपवादात्मक सुविधा, रस्त्यावरील आक्रमक अस्तित्व, उत्कृष्ट कामगिरी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आरामदायी अंतर्गत रचना ह्यांमुळे ही गाडी गाड्यांच्या गर्दीतून वेगळी उठून दिसते. ड्रायव्हिंगचा अविस्मरणीय अनुभव देऊन, एसयूव्हीप्रेमींमध्ये एक निकोप उत्साह निर्माण करण्यासाठी,ॲडव्हान्स्ड ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्म सज्ज आहे. अपवादात्मक सुविधा आणि रांगडेपणा व लग्झरी ह्यांचा मिलाफ हवा असलेल्या, अव्वल दर्जाच्या एसयूव्ही चालवणाऱ्या चिकित्सक ग्राहकांना, त्यांच्या अपेक्षेहून बरेच अधिक ही गाडी देणार आहे.”