पुण्यात मोबाईलच्या स्फोटात दहा वर्षांचा मुलगा जखमी

78

शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथील साहील नाना म्हस्के ( वय १० वर्षे ) हा मुलगा मोबाईलच्या स्फोटामुळे जखमी झाला असुन त्याच्या डोळ्याला इजा झाली असल्याने आमदार अशोक पवार यांनी प्रसंगावधान दाखवत साहिलच्या उपचारासाठी तातडीने हडपसर येथील एच व्ही देसाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची मदत उपलब्ध करुन दिल्याने म्हस्के कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

पिंपळसुटी येथील साहील म्हस्के हा मोबाईल हाताळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. त्यावेळी काही क्षण त्याला काही समजले नाही. या स्फोटाच्या आवाजाने म्हस्के कुटुंबीय धावत आले.

सर्वात प्रथम वडापाव कोणी बनवला; जाणून घ्या यामागील रंजक गोष्ट

त्यावेळी साहीलाच्या डोळ्याला इजा झाली होती. तसेच तो खूप घाबरला होता. त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता होती. कुटुंबीयांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांनी याबाबत आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांना संपर्क साधला.

यावेळी आमदार पवार यांनी मुलाची चौकशी करत काही काळजी करू नका, आपण त्याच्यावर उपचार करू, घाबरु नका मी आहे असे आधाराचे शब्द देत तातडीने सहाय्यक पी ए यांना कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले. तसेच वेळोवेळी उपचार व मुलाच्या तब्येतीची विचारणा करत कुटुंबीयांना आधार दिला.