महावितरणची लाईट अशी वापराल तर होईल गुन्हा दाखल

60

महावितरण : सध्या महावितरण कडून वीज चोरांविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. वीज तारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षभरात ८४९ ठिकाणी ५ कोटी ३४ लाख रुपयाच्या वीज चोया व विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे, तर १७७ चीज चोयामधील २ कोटी २४ लाख रुपयाची वसुली करण्यात आली आहे.

पिपरी चिंचवड शहरातील पिपरी व भोसरी विभागामध्ये वीज चोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात ४४६ ठिकाणी ३ कोटी २४ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली आहे. या वीज चोराविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ प्रमाणे कारवाई सुरू आहे. त्यासोबतच ४०३ ठिकाणी २ कोटी २० लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे निर्दशनास आले. या संबंधित ग्राहकांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली

महावितरणने वीज चोरीची मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड शहरात चोरी मोठ्या प्रमाणात उघडकीस आली आहे. त्यासोबतच आकारलेला दंड वसुलीही जोरात केली जात आहे. काही दक्षता पथकेही ही वीजचोरी शोधमोहीम हाती घेत आहेत. सध्या मागेल त्याला वीजजोडणी दिली जात आहे

वयाचदा थकबाकीदाराच्या घरी वीज मिळावी म्हणून अनेक शेजारी स्वतःच्या घरातून वीज चोरून वीजपुरवठा करतात, काही शेतकरी देखील शेजारच्या थकबाकीदाराला चोरून वीज पुरवतात. केलेली कृती ही चीजचोरी ठरते, चोरी पकडल्यास संबधितावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे वीज चोरून वापरू नये

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित थकबाकीदार शेजाऱ्याकडून किया इतर ठिकाणाहून केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व सबंधित काकाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे. थकीत वीज बिलांचा ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कद्र कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.