पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरात हल्ली एक समस्या मोठ्या प्रमाणावर सतावत आहे. ही समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची. पुणे शहरात जास्त प्रमाणात बाहेरून देखील लोक येत असतात.
अनेकदा सुट्टीच्या दिवसांमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे. पुणे शहरात वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी पुण्यामध्ये रिंग रोड उभारला जात आहे.
हा रिंग रोड पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पुणे शहरासाठी महत्त्वाचा समजला जाणारा रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांमध्ये विभागलेला असणार आहे. त्याचबरोबर पुरंदर, मावळ, मुळशी आणि खेड तालुक्यामधून हा मार्ग जाणार आहे.
पुण्यातील हा रिंग रोड उभारण्यासाठी एकूण खर्च देखील पंधरा हजार कोटी इतका येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी 12000 कोटी रुपयांची भूसंपादन देखील लागणार आहे. या रिंग रोडच्या 31 किलोमीटरचा जो पहिला टप्पा आहे त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे, त्याचबरोबर या 31 किलोमीटरचा हा टप्पा प्रस्तावित पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडरचा एक भाग देखील मानला जात आहे.
या रींग रोड साठी आवश्यक असणाऱ्या सर्व भूसंपादन प्रक्रिया देखील पार पाडल्या जात आहे परंतु आता या प्रकल्पामध्ये काही अडचणी देखील निर्माण होत आहे म्हणूनच या रिंग रोडचा वेग कमी होतो की काय अशा प्रकारचे प्रश्न देखील अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
हा पुणे रिंग रोड प्रकल्प भूसंपादनासाठी केवळ 207 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. तसे पाहायला गेले तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीच्या अर्थसंकल्पातून या रिंग रोड साठी आवश्यक असणारी तरतूद होण्याची अपेक्षा होती परंतु पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक फक्त 207 कोटी रुपये तरतूद करण्यात आली त्यामुळे या कामाला आता गती मिळणार नाही. या कामाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
हा मार्गाचे काम जर योग्य वेळी पूर्ण झाले तर पुणे शहरातील वाहतूक कोंडी लवकरच दूर करता येईल तसेच पुणेकरांना ट्रॅफिक मधून मोकळा श्वास देखील घेता येईल.