कोअर इंटिग्रा या भारतातील लीडिंग रोजगार व कामगार कायदा अनुपालन कंपनीने आपले सास आधारित, आरपीए व एआय समर्थित कम्प्लायन्स सॉफ्टवेअर सीटीआरएल एफ सह पुण्यामध्ये आपल्या पहिल्या कार्यालयाच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. भारतात कर्मचारीवर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असताना हे विस्तारीकरण कंपनीच्या सुरू असलेल्या विकासामधील प्रमुख टप्पा आहे, ज्यामुळे देशभरातील प्रमुख व्यवसाय हब्समध्ये त्यांची उपस्थिती अधिक दृढ झाली आहे.
मार्केट लीडर म्हणून कोअर इंटिग्रा आपला प्रमुख प्लॅटफॉर्म सीटीआरएल एफ च्या माध्यमातून भारतातील अव्वल पाच आयटी कंपन्यांसाठी १०० टक्के कामगार कायदा अनुपालनाची खात्री घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीने भारतातील प्रमुख ऑटो उत्पादक कंपन्यांसाठी नियामक अनुपालन देखील सोपे केले आहे, ज्यामुळे अनुपालन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व किफायतशीर बनले आहे. पुण्यातील अनेक आघाडीच्या आयटी, उत्पादन व रिअल इस्टेट कंपन्या त्यांच्या सेवांवर अवलंबून असल्यामुळे शहरातील कार्यालयाचे उद्घाटन सर्वोत्तम भावी पाऊल ठरले. या उद्योगांसाठी हब म्हणून पुण्याचे वाढते महत्त्व अत्याधुनिक आरपीए आणि एआय संचालित अनुपालन सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती कोअर इंटिग्रा कमिटमेंट अधिक दृढ करते.
मुंबईमध्ये मुख्यालय आणि सोलापूरमध्ये आयटी विकास केंद्रासह कंपनीची बेंगळुरू, चेन्नई, कोची, हैदराबाद, कोलकाता व दिल्लीमध्ये देखील कार्यालये आहेत. कोअर इंटिग्रा गेल्या वर्षभरात पुण्यामध्ये मोठा विकास पाहिला आहे. शहरातील समर्पित कार्यालय कंपनीला क्लायण्ट पाठिंबा वाढवण्यामध्ये, सेवा कार्यक्षमता सुधारण्यामध्ये आणि डिजिटाइज्ड अनुपालन व एचआर सोल्यूशन्ससाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्यामध्ये सक्षम करेल.
पुण्यातील कार्यालयामध्ये विक्री, क्लाइंट व्यवस्थापन, कार्यसंचालन आणि तंत्रज्ञानामधील वैविध्यपूर्ण टीम असेल, ज्यामधून विनासायास सेवा आणि प्रबळ क्लायण्ट सहभागाची खात्री मिळेल. सध्याच्या १२००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कर्मचारीवर्गासह कोअर इंटिग्रा आगामी महिन्यांमध्ये पुण्यात २५ नवीन टीम सदस्यांची भर करण्याची योजना आहे, ज्यामुळे त्यांच्या क्षमता अधिक दृढ होतील. शहरातील संपन्न व्यवसाय इकोसिस्टम आणि कुशल टॅलेंट समूह कंपनीच्या विकासाला गती देण्यामध्ये साह्य करतील.
या विस्तारीकरणाबाबत मत व्यक्त करत कोअर इंटिग्रा मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश चिटणीस म्हणाले, भारतभरात ७५० हून अधिक क्लायण्ट्ससह हे विस्तारीकरण आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ऑटोमेशन-नेतृत्वित अनुपालन व कर्मचारीवर्ग सोल्यूशन्समधील पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून पुण्यातील आमच्या उपस्थितीसह आम्ही क्लायण्ट्सना उत्तमप्रकारे साह्य करू, सेवा कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करू आणि आमच्या टेक-संचालित ऑफरिंग्जमध्ये वाढ करू. डिजिटाइज्ड अनुपालनासाठी वाढत्या मागणीसह पुणे आमच्या विकासाच्या भावी टप्प्याला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. कोअर इंटीग्राची मेट्रो व द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे, जेथे अधिकाधिक व्यवसायांसाठी नेक्स्ट-जनेरशन अनुपालन व एचआर टेक सोल्यूशन्स उपलब्ध होतील.