हायलँडर आणि टोकियो टॉकीज या भारतातील आघाडीच्या फॅशन ब्रॅण्ड्समध्ये गणना होणाऱ्या ब्रॅण्ड स्टुडिओ लाइफस्टाइलच्या छत्राखालील ब्रॅण्ड्सनी पुण्यात पहिले रिटेल स्टोअर सुरू करून महाराष्ट्रात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
२०२५ सालापर्यंत शहराभरात ६ रिटेल स्टोअर्स प्रस्थापित करण्याची योजना असून, यातील पहिले स्टोअर नुकतेच अॅमानोरा मॉलमध्ये उघडण्यात आले. याशिवाय बाणेर, हिंजवडी, फग्युसन रोड, कोथरुड आणि विमाननगर या भागांमध्ये आणखी स्टोअर्स सुरू केले जाणार आहेत.
अॅमानोरा मॉलमध्ये नव्यानेच सुरू करण्यात आलेले ५,००० चौरस फूट जागेतील स्टोअर हा प्रत्यक्ष (ऑफलाइन) व्यवसाय भक्कम करण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या ब्रॅण्डच्या विस्तार धोरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. स्वेटशर्ट्स, क्रॉप टॉप्स, स्वेटर्स, जॅकेट्स, ओव्हरसाइज्ड शर्ट्स आणि अशा अनेक वर्गांतील १००० हून अधिक स्टाइल्समधून ग्राहक त्यांना हवे ते निवडू शकतात.
या स्टोअरमध्ये एक्सक्लुजिव डिस्ने मार्व्हल कलेक्शन आहे. ट्रेण्डी स्टाइल्स अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ब्रॅण्डपुढे आहे. ट्रेण्डी, परवडण्याजोग्या दरातील स्टायलिश उत्पादने केवळ ६९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत.
ब्रॅण्ड स्टुडिओ लाइफस्टाइलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्याम प्रसाद म्हणाले. देशभरात ३० स्टोअर्स आधीपासूनच सक्रिय आहेत, त्यात २०२५ सालापर्यंत ९० स्टोअर्सपर्यंत मजल मारण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेत पुण्यातील स्टोअर हा महत्त्वाचा टप्पा आहे. या धोरणात्मक विस्ताराचे लक्ष्य प्रत्यक्ष व्यवसाय वाढवणे आणि फॅशन अधिकाधिक ग्राहकांच्या आवाक्यात आणून देणे हेच आहे.
हायलँडर आणि टोकियो टॉकीज डिजिटल पद्धतीने भक्कम व्यवसाय करत आहेत. मिंत्रा, फ्लिपकार्ट यांसारखे प्लॅटफॉर्म्स आणि केच अॅप यांच्या माध्यमातून हे ब्रॅण्ड्स एकत्रितपणे ३० लाख ग्राहकांना सेवा देतात. ब्रॅण्ड्सद्वारे दररोज ६०,००० हून अधिक उत्पादने शिप केली जातात आणि २०,००० हून अधिक पिनकोड्सच्या क्षेत्रांमध्ये उत्पादने पोहोचवली जातात.
देशभरात ३० स्टोअर्स आधीपासूनच सक्रिय आहेत, त्यात २०२५ सालापर्यंत ९० स्टोअर्सपर्यंत मजल मारण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेत पुण्यातील स्टोअर हा महत्त्वाचा टप्पा आहे. या धोरणात्मक विस्ताराचे लक्ष्य प्रत्यक्ष व्यवसाय वाढवणे आणि फॅशन अधिकाधिक ग्राहकांच्या आवाक्यात आणून देणे हेच आहे.