कोपा मॉल हे पुण्यातील लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन ऑक्टोबरमध्ये आणखी एक आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. मॉलमध्ये टेप अ टेलतर्फे पोएट्री पार्टी आयोजित केली जाणार असून त्यात कथाकथन, कविता आणि कल्पक अभिव्यक्तीला वाव दिला जाणार आहे. २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी टेरेसवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नव्या युगातील काही प्रमुख स्टोरीटेलर्स आणि कवींचा समावेश असेल.
पोएट्री पार्टीचे स्टार्स रंगमंचावर काव्य आणि कथांचा अनोखा मिलाफ सादर करणार आहेत. प्रेक्षकांना अमनदीप सिंग यांच्या प्रेम व विरहाच्या कथा ऐकायला मिळतील, तर वानिका सांगतानी त्यांच्या काव्यात्म नजरेतून भावनिक प्रवासाचा आढावा घेतील. दिव्या प्रकाश दुबे पहिल्या दिवशी आपल्याशा वाटणाऱ्या, भावस्पर्शी कथा सादर करतील. दुसऱ्या संध्याकाळी याहया बुटावाला रोमँटिक कथा सादर करतील, निधी नारवाल यांच्या कथांतून स्वतःला आणि नात्यांना शोधतानाचा प्रवास उलगडेल आणि रूचिका लोहिया आयुष्याबद्दलचे विचारपूर्वक प्रतिबिंब मांडतील.
कलात्मक पद्धतीने सजवण्यात आलेल्या टेरेसवर होणार असलेली ही पोएट्री पार्टी उपस्थितांना प्रेम, आयुष्य आणि प्रेरणेद्वारे भावनिक उंचीवर घेऊन जाईल. तुम्ही कवितांचे दर्दी असाल, किंवा कथांचे, हे सादरीकरण मनोरंजन आणि स्वशोधाचा उत्तम मेळ घालणारे असेल. प्रत्येक संध्याकाळी ६ ते ९ चालणार असलेल्या या टेप अ टेलमध्ये सर्जनशील आणि कथाप्रेमींच्या सहवासात एकमेकांशी कनेक्ट होण्याची अनोखी संधी मिळेल.
ठिकाण : टेरेस, कोपा मॉल
तारीख: २६ ऑक्टोबर (शनीवार) आणि २७ (रविवार)
वेळ : संध्याकाळी ६ ते रात्री ९