स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रगती करण्यासाठी जस्टडायलतर्फे पुण्यातील लहान व्यवसायांना मदत

मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर पुणे हे शिक्षण, संस्कृती आणि उद्योगाचे माहेरघर आहे. येथील नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात  अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. पुणे शहराला मोठा आणि समृद्ध सांस्कृतिक इतिहास आहे. शास्त्रीय संगीत, नाटक, क्रीडा आणि साहित्य यांचे महोत्सव पुण्यात होत असतात.

पुण्याच्या अर्थव्यवस्थेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ अनुभवली असून माहिती तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास आले आहे. नवीन स्टार्टअप हब म्हणून पुण्याचा नावलौकिक होत असताना विविध उद्योगक्षेत्रात या शहराचा जलद गतीने विस्तार होत आहे. यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी पुणे हे एक आहे. पुणे शहराला एक मजबूत औद्योगिक पाया आहे आणि प्रभावी व्यवसाय वातावरणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुमारे 7.5 लाख उद्यम-नोंदणीकृत MSMEs (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) येथे आहेत.

पुण्याच्या विकासाला हातभार लावताना जस्टडायलने MSMEs ना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांना पाठबळ आणि सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे MSMEs ना त्यांची दृश्यमानता वाढवायला आणि व्यवसायांना सोप्या पद्धतीने संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. वाढीव लीड्स, ब्रँड जागरूकता आणि ग्राहक सहभागाच्या माध्यमातून शहराच्या विशाल बाजारपेठेचा लाभ घेण्यास सक्षम करत जस्टडायल पुण्यातील अनेक उद्योजकांचा विश्वासू सहकारी बनला आहे.

पुण्यातील अनेक MSME मालकांनी जस्टडायलने त्यांच्या व्यवसायात कसे बदल घडवून आणले याबद्दल आपले अनुभव सांगितले आहेत. उदाहरणार्थ, मॉडर्न वॉटर प्युरिफायरचे मालक प्रशांत पवार यांनी जस्टडायलसोबतच्या त्यांच्या दीर्घकालीन सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “मी गेली 10 वर्षे वॉटर प्युरिफायर व्यवसायात आहे आणि माझी जस्टडायलची नोंदणी 8 ते 10 वर्षांपासून सक्रिय आहे. जस्टडायलने माझ्या व्यवसायाला महत्त्वपूर्ण चालना दिली असून त्यांच्यामुळे मला खात्रीशीर लीड्स आणि ग्राहक मिळाले आहेत. माझ्या दीर्घकालीन भागीदारीमुळे, मला दररोज 8 ते 10 दर्जेदार लीड्स मिळतात आणि माझ्या व्यवसायाचा मोठा हिस्सा जस्टडायलमधून येतो. हा खूप फायदेशीर प्रवास राहिला आहे आणि माझ्या व्यवसायाच्या सातत्यपूर्ण वाढीसाठी मी जस्टडायलवर अवलंबून आहे.”

जस्टडायलच्या सेवा व्यवसायांना स्पर्धात्मक बाजारपेठेत वाढीसाठी आवश्यक डिजिटल एक्सपोजर पुरवितात. एव्हरग्रीन एंटरप्रायझेसचे मालक स्वप्नील कुडाळे यांनी जस्टडायल पॅकेज अपग्रेड केल्याचे फायदे सांगितले. “मी 2009 पासून जस्टडायलसोबत आहे. आम्ही सुरुवातीला 12,000 रु. च्या मूलभूत पॅकेजसह सुरुवात केली, पण आमचा व्यवसाय वाढल्यामुळे, आम्ही 3 लाख रु.चे पॅकेज अपग्रेड केले. जस्टडायलने डिजिटल मार्केटिंगसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असल्याचे सिद्ध केले असून त्यामुळे व्यवसाय आणि ग्राहक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्या टीमने आम्हाला खूप मार्गदर्शन केले आहे आणि आमच्या वाढीचे श्रेय बऱ्याच अंशी जस्टडायलला जाते. आम्हाला नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी जस्टडायलचे आम्ही आभार मानतो.”

दृश्यमानता आणि लीड्स मिळवून देणे यापलीकडे जात जस्टडायल त्यांच्या ग्राहकांना मोठ्या ग्राहक आधार मिळवून देत आहे. त्यामुळे व्यवसायाची पायभरणी आणि महसुलात वाढ होत आहे. हॉटेल रेस्ट इनचे मालक समाधान पिंजारी यांनी जस्टडायलमुळे योग्य प्रकारचे ग्राहक कसे आकर्षित झाले याबद्दल सांगितले. “जस्टडायलमध्ये नोंदणी केल्यानंतर आम्हाला अपेक्षित प्रकारचे ग्राहक आमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तेव्हापासून आम्हाला चांगला नफा मिळतो आहे आणि अनेक दर्जेदार लीड्स मिळाल्या आहेत. जस्टडायल माझ्या व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे.”

अशा असंख्य MSMEs ने त्यांच्या व्यवसायाच्या यशोगाथा अनुभवल्या असून, जस्टडायल त्यांना वाढ, दृश्यमानता आणि ग्राहक सहभागासाठी व्यापक प्लॅटफॉर्म पुरवत पुणे आणि त्यापलीकडे व्यवसायांना सक्षम करण्याचे कार्य करत आहे.