BIG NEWS : शिक्रापूर येथे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By: Editor_Pratik

On: Thursday, September 26, 2024 11:46 AM

बलात्कार
Google News
Follow Us

शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा 13 ते 14वर्षाचा मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे,

शिक्रापूर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 883/2024 भारतीय न्याय संहिता कलम 65/2 बाल लैंगिक अत्याचार का क 4,8,12, नुसार संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

त्याचे मूळ जळगाव आहे, याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार ता 25 रोजी सकाळी अकरा वाजता पती टेलरिंग च्या कामाकरता निघून गेले होते, त्यानंतर दुपारी एक वाचण्याच्या सुमारास पीडित लहान मुलगी घरात खेळत होती,

घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली घरी आले त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा दिसला, म्हणून घरात पाहिले असता, घरातील आरोपी याने मुलीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले,

त्यानंतर तिथून पळून गेला मुलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, या संदर्भातील पूर्ण माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार मध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now