जगातील सर्वात मोठ्या आभूषण विक्रेत्या समूहापैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला २०२३-२४ साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स (आयजीसी) विश्वासार्ह सराफ पेढी’ (रिस्पॉन्सिबल ज्वेलरी हाऊस) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय जवाहीर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारापैकी एक असलेला हा बहुमान, नैतिक स्रोतांतून सोने मिळविणे आणि टिकाऊपणाबद्दल मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची दिसून आलेली अतूट वचनबद्धता या अनोख्या वैशिष्ट्यांना दिली गेलेली कौतुकपर मान्यता आहे.
हा पुरस्कार मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या कायदेशीर स्त्रोतांतून आणि जबाबदारीने खनन केलेले सोने आणि हिरे मिळविण्याच्या समर्पण वृत्तीला अधोरेखित करतो, तसेच दागिन्यांचा प्रत्येक नग हा शुद्धता आणि अखंडतेच्या सर्वोच्च मानकांसह तयार केला गेला आहे याची खात्री देखील यातून दिली जाते.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वतीने, भारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशर यांनी हिल्टन मान्यता बिझनेस पार्क, बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुंदरवल्ली नारायणस्वामी यांच्याकडून हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी मलाबार गोल्ड एलएलसीचे व्यवसाय विकास प्रमुख सीतारामन वरदराजन; मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे बुलियन विभागाचे प्रमुख दिलीप नारायणन; फिनमेट पीटीई लिमिटेडचे संचालक सुनील कश्यप; रँड रिफायनरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बैजनाथ आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे कर्नाटक क्षेत्रीय प्रमुख फिलसोर बाबू यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि नैतिक व्यवसाय पद्धतींबद्दल कंपनीच्या वचनबद्धतेचाही त्यांना पुनरूच्चार केला. ते म्हणाले, “आम्हाला आयजीसीकडून ‘विश्वासार्ह सराफ पेढी’ हा बहुमान मिळाल्याबद्दल खूप गौरवास्पद वाटत आहे. सोने आणि हिरे या अनमोल भेटवस्तू आहेत, ज्याची लग्न सोहळा आणि वाढदिवस या सारख्या जीवनातील सर्वात आनंदाच्या क्षणी देवाणघेवाण केली जाते.
हा मौल्यवान ऐवज नैतिकदृष्ट्या देखील योग्य राहिल याची ग्राहकांना पुरेपूर खात्री पटेल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कायदेशीर उत्पत्तीपासून, शोषणापासून मुक्त सोने मिळविले असेल तरच त्यापासून बनलेल्या भेटवस्तू या पवित्रता, शुद्धता आणि तेजस्वीतेचे प्रतीक बनू शकतात, याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे भारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशर यांनी, कंपनीकडून व्यवसाय सुरू असणाऱ्या प्रत्येक देशात कायदेशीर आणि कर नियमांचे पालन केले आहे यावर प्रकाश टाकला. “आम्ही खरेदी आणि विक्री करत असलेल्या सोन्याच्या पट्ट्या जबाबदारीने आणि पूर्णपणे कायदेशीर आहेत याची आम्ही खात्री करतो.
आम्ही केवळ लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) द्वारे गुणवत्ता-प्रमाणित लंडन गुड डिलिव्हरी बार (एलजी़डीबी), दुबई गुड डिलिव्हरी बार (डीजी़डीबी) आणि एचयूआयडी-हॉलमार्क चिन्हांकित केलेले इंडियन गुड डिलिव्हरी बार वापरतो. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने आधीच जगभरात एक विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे,”