मुंबई, ऑगस्ट 2024 : एंजल वन लिमिटेड ही एक अग्रगण्य फिनटेक कंपनी असून, प्रत्येकाला आर्थिक प्रवासात सक्षम बनविण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने स्वातंत्र्य दिन #AzaadiKaRaasta मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा प्रवास स्पष्ट करणारा एक प्रभावी सामाजिक-प्रथम दृष्टिकोन आहे. आर्थिक भविष्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची, दृढनिश्चयाची आणि चिकाटीची खात्री देऊन ही मोहीम ठरविलेल्या उद्देशापर्यंत प्रवास साजरा करते.
प्रत्येकासाठी आर्थिक स्वातंत्र्य हा एंजेल वनचा दृष्टिकोन आहे. तो साध्य करण्यायोग्य ध्येय बनवून व्यक्तींना सक्षम बनविणे आहे. #AzaadiKaRaasta मोहीम आर्थिक स्वातंत्र्याच्या अथक प्रयत्नांचा सन्मान करत कंपनीच्या दृष्टिकोनाचा पुरावा आहे. या उपक्रमाद्वारे लोकांना त्यांच्या प्रवासात प्रेरणा देणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे एंजल वनचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हा महत्त्वाचे आहे.
या अनोख्या मोहिमेचे उद्दिष्ट अधोरेखित करून एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी यांनी आपले मत मांडले, ते म्हआले, ”एंजेल वन येथे आम्ही लोकांना त्यांच्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम करण्यासाठी समर्पित आहोत. #AzaadiKaRaasta ही आमची मोहीम वय, व्यवसाय किंवा अनुभवाची पर्वा न करता, सर्व स्तरांतील लोकांशी जोडण्यासाठी तयार केलेली आहे. विविध प्रकारच्या आर्थिक उत्पादनांमध्ये स्मार्ट गुंतवणुकीचे समर्थन करून, आम्ही प्रत्येक भारतीय नागरिकाला खरे आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आवश्यक साधने आणि ज्ञानाने सुसज्ज करण्याचे ध्येय ठेवतो. ही मोहीम आर्थिक स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव करते.
चित्रपटाची सुरुवात आर्थिक स्वातंत्र्याच्या सार्वत्रिक शोधावरील कथनाने होते, ज्यामध्ये विविध व्यक्तींना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर दाखवले जाते. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले समर्पण आणि कठोर परिश्रम आकर्षक व्हिज्युअल्सद्वारे स्पष्ट होतात, बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या लोकांची दृश्ये हायलाइट केली जातात, गुंतवणूक करतात आणि टप्पे साजरे करतात. आर्थिक स्वातंत्र्यासाठी चिकाटीने प्रयत्न आणि स्मार्ट निर्णयांची आवश्यकता असते, हे यात दाखविले आहे. जे यासाठी प्रयत्न करतात, त्यांना सलाम करून, एंजेल वनला सहायक भागीदार म्हणून स्थान दिले जाते.
#AzaadiKaRaasta मोहिमेमध्ये एक व्यापक, बहु-प्लॅटफॉर्म रणनीती, अत्याधुनिक डिजिटल टूल्स आणि सर्जनशील दृष्टिकोनांचा समावेश आहे, ज्यात विविध प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी प्रभावशाली सहयोग व सोशल मीडिया प्रतिबद्धता समाविष्ट आहे.