पुणे, ता. मे : बीएनसी मोटर्स, या देशातील अग्रगण्य इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनीने तिचे पहिले कोको म्हणजे कंपनीच्या मालकीचे, कंपनी संचालित शोरूम येथे सुरू केले आहे. बाणेर येथील प्राइमरोज मॉलमध्ये हे शोरूम असून, ते संभाव्य ग्राहकांसाठीच नाही, तर पश्चिम विभागीय क्षेत्रीय मुख्य कार्यालय म्हणूनही काम करेल.
या शोरुमचे उद्घाटन नुकतेच जपानमधील मुसाशी सेमित्सु इंडस्ट्री कंपनी लि.चे संचालक सदस्य हरी नायर यांच्या हस्ते झाले. यावेळी बीएनसी मोटर्सचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बीएनसी मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अनिरुद्ध रवी नारायणन म्हणाले, “पुणे हे भारतातील एक उत्तम ऑटोमोटिव्ह हब आहे. येथे पश्चिम विभागात आमची पहिली डीलरशिप सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे एक सतत घडामोडी घडणारे, उद्योजकीय शहर आहे. या शहराचे स्पिरीट आमच्याशी जुळते, म्हणूनच आम्ही येथे प्रादेशिक विक्री कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला. प्रादेशिक कार्यालय असेल, तर शोरूमदेखील का नको, या विचारातून कोको शोरूम सुरू करण्याचा निर्णय घेतला.भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात डीलरशिपद्वारे कंपनी विस्तार करणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
चालू कॅलेंडर वर्षात, बीएनसी मोटर्सने संपूर्ण भारतातील प्रमुख क्षेत्रांमध्ये कोको शोरूम आणि प्रादेशिक विक्री कार्यालये उघडण्याची योजना आखली आहे. यात पुणे प्रथम आहे. कंपनीची ही विस्तार योजना, देशात शाश्वत मोबिलिटी सोल्युशन्सला प्रोत्साहन देण्याप्रति कंपनीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब दर्शवतो.
या शोरूममध्ये बीएनसी मोटर्सच्या चॅलेंजर एस ११० आणि एस १२५ या इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या ई-बाईकसह उपलब्ध असणार आहेत. लवकरच पेरफेट्टो स्कूटर आणि द बॉस एनआर १५० ई-बाईकदेखील येथे सादर होतील, त्यांची किंमत अनुक्रमे १.०९ लाख आणि १.५७ लाख रुपये असेल.