असलम बागवान यांचा सायकलवरून प्रचार

By: Editor_Manas

On: Saturday, May 4, 2024 4:39 AM

Google News
Follow Us

 शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकसेना पार्टी चे अधिकृत उमेदवार, ओबीसी बहुजन पार्टी चे पुरस्कृत उमेदवार असलम इसाक बागवान यांनी महाराष्ट्र दिनी प्रचारास कोंढवा,हडपसर भागात प्रारंभ केला.या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे सायकलला भोंगा लावून सायकल वरून अगदी अल्पखर्चात  लोकशाहीला अभिप्रेत असलेली मूल्ये मतदारांपर्यंत पोहचविण्या करीता ,जनतेचे प्रश्न जमिनी स्तरावर स्वतः समजून घेण्याकरीता प्रयत्न केला गेला.असलम इसाक बागवान यांनी आज आपल्या प्रचाराची सुरूवात हडपसर विधानसभा मतदारसंघ येथील प्रसिद्ध मस्जिद तालाब मस्जिद चौक येथुन सकाळी ८ वाजता  करून सोमजी गाव,कोढवा बुद्रुक येथील जवळ जवळ पाच हजारहून अधिक घरामध्ये प्रचार करण्यात आला.२ मे रोजी बागवान यांनी सुखसागरनगर,हडपसर परिसरातील मतदारांशी संवाद साधला. 

डॉ.सूर्यवंशी,सचिन अlल्हाट,अकबर मेमन, जब्बार बागवान, इब्राहिम शेख,आरिफ शेख,वीणा कदम यांनी या प्रचारात सहभाग घेतला.या प्रचारादरम्यान असलम इसाक बागवान यांनी जनतेशी संवाद साधताना त्यांच्या हे लक्षात आले की, आजपर्यंत कुठल्याच खासदाराला या जनतेने पाहिलेले नाही.त्यांची नावे देखील मतदारांना माहिती नाहीत.त्यांनी  कधीही नागरीकांशी संवाद साधला नाही अथवा साधी भेटही  घेतली नाही.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now