पुणे,२० एप्रिल, २०२४: ऑर्किड्स द इंटरनशनल स्कूलने त्याच्या हिंजवडी कॅम्पस, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी आहारातील बाजरीचे महत्व याविषयी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बाजरीच्या प्रकारांबाबत, अपायकारक पदार्थ आणि मैद्यासाठी ते आरोग्यदायी पर्याय कसे आहेत, आणि बाजरीच्या समावेशासह काही घरगुती पाककृती कशा बनवल्या जातात याबद्दल माहिती देण्यात आली.
मुख्य अतिथी, मिलेटस्टोरीच्या सह-संस्थापिका सुश्री प्रतिभा इटगी यांच्या नेतृत्वात या कार्यशाळेत ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना फॉक्सटेल बाजरी (कोरालु), ब्राउनटॉप बाजरी (अंदू कोरालू), लिटल बाजरी (सामालू), कोडो बाजरी (अरिकालू) आणि बार्नयार्ड बाजरी (ओडालू) या पाच सकारात्मक बाजरीबद्दल शिकायला मिळाले. पालकांना बाजरीचा वापर करून सोप्या पाककृती कशी बनवायची याचे प्रशिक्षण देऊन, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने आपल्या विद्यार्थ्यांच्या आहारात बाजरीचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सुश्री प्रतिभा इटगी म्हणाल्या, “विद्यार्थी आणि पालकांना बाजरीमुळे आरोग्याला मिळणारे फायदे आणि दैनंदिन आहारामध्ये त्यांच्या समावेशाबद्दल शिक्षित करणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. या कार्यशाळेचे यश सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिसून येते. पौष्टिक आहार घेण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना अमूल्य ज्ञानाने सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलचे कौतुक करते.”
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी शाखेच्या मुख्याध्यापिका, सुश्री शिखा त्रिपाठी, म्हणाल्या, “आपल्या रोजच्या आहारात बाजरीचा समावेश केल्याने होणाऱ्या आरोग्याचे फायदे जाणून घेण्यासाठी आपला समुदाय एकत्र येणे प्रेरणादायी आहे. ही कार्यशाळा आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये एकंदर स्वास्थ्य आणि पोषणबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनशैलीवर या ज्ञानाचा सकारात्मक परिणाम पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”