कोव्हीड संकटात सर्व उपाय योजना आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका डॉक्टर या नात्याने खा.सुजय विखे पाटील यांनी घेतली.कुठेही स्टंटबाजी न करता त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला जनता भक्कमपणे साथ देईल असा विश्वास डॉ मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केला.
खा डॉ सुजय विखे यांची उमेदवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना पुन्हा उमेदावारी देण्यात आल्याने या मतदार संघातील जनता खा.विखे यांना समर्थन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालयात स्वतंत्र कोव्हीड सेंटर सुरू करून जिल्ह्यातील रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करून दिली.रूग्णांना प्राणवायू उपलब्ध होत नव्हता आशा काळात स्वतंत्र असा आॅक्सिजन प्रकल्प सुरू केला.रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता प्रत्येक रुग्णाला करून दिली.यामध्ये त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्यचा प्रयत्न झाला.पण थोडेही विचलित न होता खा.डॉ विखे पाटील कोव्हीड योध्दा म्हणून काम करीत राहीले.
कोव्हीड कालावधीत इतर सर्व रुग्णालय बंद असताना खा.डॉ विखे यांनी विखे पाटील रूग्णालयात सुमारे सातशेहून अधिक महीलांच्या प्रसूती मोफत करून देत सामाजिक सामाजिक बांधिलकी जोपासली.
सिंधू अन्नछत्र मोफत किरणा किटचे गरजू व्यक्तिना वाटप केले. जिल्ह्यातील २७०शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या कुटूबियांना दतक घेवून त्यांच्या परीवारात रोजगार आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या कुटूबियांची मोठी समस्या दूर करण्यात खा.विखे यांनी घेतलेली भूमिका सर्वाच्या दृष्टिने अभिमानास्पद राहील्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी सांगितले
कोव्हीड संकटात केंद्र सरकारने खासदारांना मिळणारा सर्व निधी कोव्हीड फंडासाठी वापरण्यात आला.
परंतू निधी नाही म्हणून कोणतेही कारण न सांगता खा.विखे अविरतपणे कोव्हीड संकटात मतदार संघातील जनतेच्या पाठीशी कोव्हीड योध्दा म्हणून उभे राहीले हे महत्वपूर्ण आहे.
कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.परंतू कोव्हीड संकटातील उपाय योजना होवू शकल्या नव्हत्या.पण खा.विखे यांनी उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून कोव्हीड संकटावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षवेधी होते.कुठेही प्रसिध्दीचा डामडौल आणि स्टंट बाजी न करता डॉक्टर या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिकाच लोकांना भावली असल्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे म्हणाले.
विखे पाटील परीवाराच्या सामाजिक बांधिलकीची मोठी परंपरा असून तीन पिढ्यांचा वारसा खा.डॉ सुजय विखे पुढे घेवून जात आहेत.राजकारणाच्या पलीकडे जावून विखे पाटील परीवार कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची घेत असलेल्या भूमिकेला जनता चांगले पाठबळ देईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योजकांचा एम.आय.जी उद्योजक पुरस्कार देवून नुकतेच गौरवण्यात आले. या प्रसंगी धूत ट्रान्समिशनचे संचालक राहुल धूत व माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष शरद सोनी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी एम.आय.जीचे अध्यक्ष मनोज बेहेडे, संजय भुतडा, आशिष डालिया, जितेंद्र लखोटिया असे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने भगीरथजी तापडिया पुरुष उद्योजक पुरस्कार – मनीष राठी, ओंकारनाथजी मालपाणी महिला उद्योजक पुरस्कार लीना राठी, चंपालाजी सारडा वरिष्ठ कार्यकारिणी पुरस्कार – अनुप तोतला, विश्वनाथ बेहेडे सर्वोत्कृष्ट नवनिर्माण पुरस्कार – डॉ. दिनेश भुतडा यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, पदक असे होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थींनी मनोगते व्यक्त केली.
राहुल धूत म्हणाले की माहेश्वरी समाजातील उद्योजकांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी आहे. अशा यशस्वी उद्योजकांना माझ्या हस्ते पुरस्कार प्रदान करताना मला आंतरिक समाधान होत आहे. शरद सोनी म्हणाले की माहेश्वरी समाजातील तरुणाई मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. जास्तीत जास्त देश हिताची कामे करण्याची युवा पिढी करेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज बेहेडे आणि अर्चना बेहेडे यांनी केले तर आभार कोहिनूर इंदानी यांनी मानले.