पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) मध्ये आयटी सेमिनार आणि रिसर्च पेपर कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते . ‘करंट डायनामिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ‘ हा या सेमिनारचा आणि स्पर्धेचा विषय होता. ६ एप्रिल रोजी भारती विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलामध्ये हा कार्यक्रम झाला .आय एम इ डी चे प्रभारी संचालक डॉ .अजित मोरे, उपप्राचार्य डॉ .रामचंद्र महाडिक तसेच प्रमुख पाहुणे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अतुल कहाते, मनुष्य बळ विकास क्षेत्रातील तज्ज्ञ धनंजय शिंदे उपस्थित होते. कृपा धर्माधिकारी, अवंतिका बर्धन, नीती मालू या विजेत्यांना करंडक आणि प्रमाणपत्र देण्यात आली. स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी सहभाग घेतला.संगीता पाटील ,डॉ.सत्यवान हेंबाडे,डॉ.स्वाती देसाई,डॉ.श्वेता जोगळेकर,डॉ.सुजाता मुळीक,दीप्ती देशमुख,प्रतिमा गुंड यांनी संयोजन केले. अतुल कहाते यांनी माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन क्षेत्रातील संधी आणि तयारी बद्दल मार्गदर्शन केले.