सोन्याच्या दरातील घसरणीचा आलेख कायम; पाच दिवसांत तोळ्यामागे ५ हजारांची घट!

By: Editor_Manas

On: Friday, November 13, 2026 2:52 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी मानस : जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होत आहे. विशेषतः सोन्याच्या दरातील घसरणीचा कल कायम असून, अवघ्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे सुमारे ५ हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उपलब्ध दरांनुसार, नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३९,९४० रुपयांवर, तर मुंबईत १,३९,७९० रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून २४ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान, केवळ भारतीय बाजारपेठेतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतींवर घसरणीचा दबाव कायम आहे. जानेवारीतील विक्रमी तेजीच्या तुलनेत सध्याची घसरण लक्षणीय मानली जात आहे.

सोन्याच्या दरातील ही घसरण आणखी किती काळ सुरू राहणार आणि आगामी काळात दर पुन्हा वाढणार की आणखी खाली येणार, याकडे गुंतवणूकदारांसह सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 12, 2026

November 12, 2026