पुणे, 13 नोव्हेंबर 2026 : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मुंबईतील मालाड पश्चिम येथे महिलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातून मुंबईत उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या सुमारे २०० महिलांना या वसतिगृहाचा लाभ मिळणार आहे. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘परमार्थ रत्न सन्मान’ सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत महिलांना सवलतीच्या दरात निवास, भोजन, ग्रंथालय आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. घरापासून दूर राहून शैक्षणिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले हे योगदान शिक्षण अधिक सुलभ करण्यासह महिलांना स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने पुढे जाण्यास सक्षम करण्याच्या अग्रवाल यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन
अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे शिक्षण हे वेदांता समूहाच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख क्षेत्र आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्याचा विचार करणाऱ्या दृष्टिकोनातून समूहाकडून बालशिक्षण, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंत विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणापासून रोजगारापर्यंतचा एकात्मिक मार्ग निर्माण करण्याचा यामागील उद्देश आहे.
या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना हातभार लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्दिष्ट ४ (गुणवत्तापूर्ण शिक्षण), उद्दिष्ट ५ (लैंगिक समानता), उद्दिष्ट ८ (सन्मानजनक रोजगार आणि आर्थिक विकास), उद्दिष्ट १० (विषमता कमी करणे) आणि उद्दिष्ट १७ (उद्दिष्टपूर्तीसाठी भागीदारी) यांचा समावेश आहे. सर्वसमावेशक शिक्षणाची उपलब्धता वाढविणे, रोजगारक्षमता बळकट करणे आणि वंचित समुदायांसाठी संधी निर्माण करणे यावर समूहाचा भर आहे.
बालशिक्षणातून भक्कम पायाभरणी
वेदांताच्या बालशिक्षण उपक्रमांमध्ये ‘नंद घर’ हा प्रमुख सामाजिक उपक्रम आहे. पारंपरिक अंगणवाड्यांचे आधुनिक आणि सर्वांगीण विकास केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचे काम या माध्यमातून केले जाते. देशातील १८ राज्यांमध्ये १६,५०० हून अधिक नंद घर केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये खेळावर आधारित आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून बालशिक्षण दिले जाते. तसेच मुले, माता आणि समुदायांसाठी एकात्मिक पोषण व आरोग्यसेवाही उपलब्ध करून दिल्या जातात.
शालेय आणि उच्च शिक्षणाची व्याप्ती वाढविणे
वेदांता फाउंडेशनअंतर्गत समूहाचा ‘वेदांता शिक्षा’ हा शिक्षण उपक्रम राजस्थान, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील सात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करतो. यामध्ये राजस्थानमधील रींगसमधील वेदांता पी.जी. गर्ल्स कॉलेज आणि वेदांता गुरुकुल पब्लिक स्कूल, भरतपूरमधील बाबूराम वेदांता स्कूल आणि बाबूराम वेदांता स्पेशल स्कूल, महाराष्ट्रातील मुंबईच्या विठ्ठलवाडी येथील वेदांता कॉलेज आणि वेदांता स्पेशल स्कूल तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील वेदांता कॉलेज यांचा समावेश आहे. या संस्थांमधून शालेय आणि उच्च शिक्षणासोबत दिव्यांग मुलांसाठी विशेष शैक्षणिक सुविधाही पुरविल्या जातात.
समूहाच्या विविध कंपन्यांकडूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष उपक्रम राबविले जातात. सुरक्षित आणि तंत्रज्ञानयुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत सुधारणा व्हावी यासाठी शैक्षणिक मदत दिली जाते.
हिंदुस्तान झिंकचा ‘शिक्षा संबल’ हा उपक्रम फेलोशिप मॉडेलच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत करतो. यामध्ये पूर्वव्यावसायिक प्रशिक्षण आणि समुपदेशन सत्रांचा समावेश आहे. तर ‘उंची उडान’ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी चार वर्षांचे निवासी एकात्मिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते.
ओडिशामध्ये वेदांता ॲल्युमिनियमचे ‘प्रोजेक्ट विद्याग्रह’, ‘ज्ञानज्योती’ आणि ‘प्रोजेक्ट विद्या’ हे उपक्रम डिजिटल शिक्षण, शैक्षणिक मदत, शिक्षक विकास आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून शालेय शिक्षण अधिक सक्षम करतात. समूहाकडून ‘एसटीईएम लॅब्स’ आणि ‘मिनी सायन्स सेंटर्स’च्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयांचे शिक्षण तसेच प्रात्यक्षिकाधारित शिक्षणालाही प्रोत्साहन दिले जाते.
शिक्षणाची कौशल्य आणि रोजगाराशी सांगड
शिक्षणातून रोजगाराच्या अर्थपूर्ण संधी निर्माण होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन वेदांता समूहाने व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता वाढविण्यावरही भर दिला आहे. ‘वेदांता रोजगार’ या उपक्रमांतर्गत २० राज्यांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे चालविली जातात. या केंद्रांमध्ये तरुणांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्याबरोबरच नोकरी मिळविण्यासाठी मदत केली जाते.
समूहाच्या विविध कंपन्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या पूरक कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधींशी सुसंगत व्यावहारिक प्रशिक्षण आणि उद्योगक्षेत्राचा अनुभव दिला जातो.
या परस्परपूरक उपक्रमांच्या माध्यमातून वेदांता समूह व्यक्तीच्या शैक्षणिक प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर मदत करणारी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘देश की जरूरतों के लिए’ या तत्त्वज्ञानानुसार पुढील पिढीला ज्ञान, कौशल्ये आणि संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी तसेच भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी सक्षम करण्याची समूहाची बांधिलकी आहे.





