हिरो मोटोकॉर्पने टीएफटीसह एक्स्ट्रीम १२५आर स्टील्थ एडिशन लाँच करत स्पोर्टी १२५सीसी श्रेणीत स्तर उंचावला

By: Editor_Manas

On: Friday, November 13, 2026 2:23 PM

Google News
Follow Us

हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल आणि स्कूटर उत्पादक कंपनीने आज नवीन एक्स्ट्रीम १२५आर स्टील्थ एडिशन विथ टीएफटीच्या लाँचची घोषणा केली, ज्यामुळे भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या स्पोर्टी १२५सीसी मोटरसायकल श्रेणीतील त्यांचे वर्चस्व अधिक प्रबळ झाले आहे. ब्रँडचे मूळ तत्त्वज्ञान “लाइव्ह एक्स्ट्रीम”ला साजेसा हा नवीन व्हेरिएंट नव्या पिढीच्या रायडर्ससाठी डिझाइन केला आहे, जे उत्तम कार्यक्षमता, शैली, सुधारित रायडर सुरक्षा आणि आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीची अपेक्षा ठेवतात. ही नवीन व्हेरिएंट मोटरसायकल श्रेणींमध्ये प्रीमियम तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर हिरो मोटोकॉर्पचा निरंतर भर दर्शवते.

या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा म्हणाले, “स्पोर्टी १२५सीसी श्रेणी वेगाने विकसित होत आहे. ही वाढ तरुण ग्राहकांमुळे होत आहे, जे केवळ कार्यक्षमता आणि डिझाइनद्वारेच नव्हे, तर प्रगत तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणाऱ्या मोटरसायकलच्या शोधात असतात. एक्स्ट्रीम १२५आर ने व्यापक ग्राहकांपर्यंत प्रीमियम अभियांत्रिकी आणि श्रेणीतील अग्रगण्य वैशिष्ट्ये पोहोचवून या श्रेणीमध्ये आधीच मापदंड स्थापित केला आहे. टीएफटीसह नवीन स्टील्थ एडिशन कनेक्टेड तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक सुलभ बनवून, तसेच ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करून हा स्तर आणखी उंचावते आणि त्यांना खऱ्या अर्थाने ‘लाइव्ह एक्स्ट्रीम’ जगण्यास सक्षम करते.”

कनेक्टेड रायडिंग अनुभव

या नवीन व्हेरिएंटच्या केंद्रस्थानी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह ४.२ इंच व्हायब्रंट टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो नेव्हिगेशन, कम्युनिकेशन आणि राइडची माहिती सहजपणे एकत्रित करतो. हे नवीन वैशिष्ट्य रायडरला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल व एसएमएस अलर्ट आणि म्युझिक कंट्रोल सहजपणे उपलब्ध करून देते, ज्यामुळे एक्स्ट्रीम १२५आर च्या रायडर्सना प्रत्येक राइडवर विनासायास कनेक्ट ठेवणारा आधुनिक, तंत्रज्ञान-आधारित अनुभव मिळतो.

श्रेणीतील पहिली सुरक्षा नाविन्यता

एक्स्ट्रीम १२५आर ने श्रेणीतील पहिली टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) देखील सादर केली आहे, जे मोठ्या क्षमतेच्या मोटरसायकल्समध्ये आढळणारे महत्त्वाचे सुरक्षा आणि सुविधेचे वैशिष्ट्य आहे. रायडरच्या सुरक्षेशी असलेली हिरो मोटोकॉर्पची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करत एक्स्ट्रीम १२५आर टीपीएमएस सुविधा देणारी स्पोर्टी १२५सीसी श्रेणीतील पहिली मोटरसायकल ठरेल. रिअल-टाइम टायर प्रेशर माहिती आणि इन्स्टंट अलर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांसह ही सिस्टम रायडर्सना विविध रस्त्यांच्या परिस्थितीत सुरक्षितता, सुलभता आणि रायडिंगचा आत्मविश्वास वाढवताना टायरचे आरोग्य उत्तम राखण्यास सक्षम करते.

अधिक स्पोर्टी, शार्प आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन

आपले स्पोर्टी आकर्षण आणखी वाढवत टीएफटीसह एक्स्ट्रीम १२५आर स्टील्थ एडिशन आता कलर्ड अॅलॉय व्हील्ससह येते, ज्यामुळे मोटरसायकलला आक्रमक डिझाइन तत्त्वज्ञान कायम ठेवताना अधिक आकर्षक, प्रीमियम आणि उद्देशपूर्ण रूप मिळते.

मापदंड प्रस्थापित करणारी कार्यक्षमता

आधुनिक तंत्रज्ञानाव्यतिरिक्त नवीन व्हेरिएंट कार्यक्षमता आणि सुरक्षेचे तेच पॅकेज देणे सुरू ठेवेल, ज्याने एक्स्ट्रीम १२५आर ला श्रेणीतील सर्वात लक्षवेधक मोटरसायकल बनवले आहे. मोटरसायकलमध्ये उत्तम ब्रेकिंग आत्मविश्वासासाठी श्रेणीतील पहिले ड्युअल चॅनेल एबीएस, रायडर्सना वेगवेगळ्या रायडिंग परिस्थितीनुसार कार्यक्षमता जुळवून घेण्याची सुविधा देणारे तीन राइड मोड्स रेन, रोड व स्पोर्ट आहे. तसेच या मोटरसायकलमध्ये लांबच्या प्रवासात आराम वाढवणारे क्रूझ कंट्रोल वैशिष्ट्य कायम ठेवण्यात आले आहे. एकत्र मिळून, ही वैशिष्ट्ये टीएफटीसह एक्स्ट्रीम १२५आर स्टील्थ एडिशनला स्पोर्टी १२५सीसी श्रेणीतील सर्वात परिपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण मोटरसायकल बनवतात.

रंग आणि किंमत

एक्स्ट्रीम १२५आर ची नवीन स्टील्थ एडिशन आकर्षक रंगात उपलब्ध असेल – मिडनाइट ब्लॅक कलर विथ पर्ल रेड अॅक्सेंट्स. ही मोटरसायकल देशभरातील हिरो मोटोकॉर्पच्या डीलरशिपवर १,१५,००० रूपये (एक्स-शोरूम, संपूर्ण भारतभर) या आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 12, 2026

November 12, 2026