इंडसइंड सिक्युरिटीजतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे विकास; मुख्य अधिकारी – राजीव आर. श्रीवास्तव

By: Editor_Manas

On: Saturday, October 24, 2026 5:56 PM

Google News
Follow Us

राष्ट्रीय, ऑक्टोबर 2026 : इंडसइंड कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी आणि आघाडीच्या बँकिंग व वित्तीय सेवा समूह असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IIHL) चा भाग असलेल्या इंडसइंड सिक्युरिटीज लिमिटेडने (पूर्वीची रिलायन्स सिक्युरिटीज लिमिटेड) आज भांडवली बाजार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व राजीव आर. श्रीवास्तव यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. या नियुक्तीमुळे भारतातील प्रस्थापित ब्रोकिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. देशातील गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढत असताना, आधुनिक आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देणारा गुंतवणूक प्लॅटफॉर्म म्हणून स्वतःला विकसित करण्याच्या दिशेने कंपनी वाटचाल करणार आहे.

राजीव यांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि भांडवली बाजार या क्षेत्रांमध्ये जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. बाजारातील विविध चढ-उतारांच्या काळात त्यांनी ब्रोकिंग व्यवसायांचे नेतृत्व केले आहे. व्यवसायाचे परिवर्तन, डिजिटल नाविन्यपूर्णता आणि शाश्वत विकासासाठी सक्षम व्यावसायिक संस्था उभारणे या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

इंडसइंड सिक्युरिटीजमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी त्यांनी एचडीएफसी सिक्युरिटीज, रिलायन्स सिक्युरिटीज आणि आयसीआयसीआय बँक येथे वरिष्ठ नेतृत्वाच्या पदांवर काम केले आहे. राजीव हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांच्याकडे विपणन विषयातील एमबीए पदवी आहे.

इंडसइंड सिक्युरिटीजमध्ये राजीव कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करतील. कंपनीच्या व्यवसायाला नवचैतन्य देणे आणि भारतातील बदलत्या गुंतवणूक क्षेत्रात कंपनीला अग्रस्थानी आणणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून प्रत्येक ग्राहकाच्या गरजांनुसार वैयक्तिकृत संशोधन व सल्ला उपलब्ध करून देणे आणि विविध प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करणे याला प्राधान्य दिले जाईल. तसेच, कंपनीचा विस्तार नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये करण्यावरही ते लक्ष केंद्रित करतील. इंडसइंड समूहाच्या व्यापक परिसंस्थेचा लाभ घेत, ग्राहकांना बँकिंगपासून गुंतवणुकीपर्यंतचा अखंड आणि सुलभ अनुभव देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. या सर्व प्रयत्नांतून दीर्घकालीन दृष्टिकोन असलेला आणि विविध आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असा ब्रोकिंग व्यवसाय उभारला जाईल.

या नियुक्तीचे स्वागत करताना इंडसइंड कॅपिटल लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रूपम अस्थाना म्हणाले, “भारतातील गुंतवणूकदारांच्या नव्या पिढीसाठी सक्षम आणि डिजिटल तंत्रज्ञानाने सुसज्ज असा भांडवली बाजारातील व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने आम्ही कंपनीच्या व्यवसायाची नव्याने उभारणी करत असताना, राजीव इंडसइंड सिक्युरिटीजमध्ये एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर रुजू होत आहेत. या क्षेत्रातील त्यांचा सखोल अनुभव, धोरणात्मक दृष्टिकोन तसेच व्यवसायाचे परिवर्तन घडवून आणण्याची आणि त्याचा विस्तार करण्याची सिद्ध क्षमता यांमुळे या प्रवासाचे नेतृत्व करण्यासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वासार्हता आणि सुशासनाची सर्वोच्च मानके कायम राखत इंडसइंड सिक्युरिटीज आपल्या विकासाला अधिक गती देईल, बाजारपेठेतील लक्षणीय हिस्सा मिळवेल आणि ग्राहकांच्या अनुभवासाठी नवे मापदंड प्रस्थापित करेल असा मला विश्वास आहे.”

आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना इंडसइंड सिक्युरिटीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव आर. श्रीवास्तव म्हणाले, “भारताच्या भांडवली बाजारात सध्या संरचनात्मक बदल घडत असताना इंडसइंड सिक्युरिटीजचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा विक्रमी सहभाग, डिजिटल तंत्रज्ञानाचा झपाट्याने वाढणारा स्वीकार आणि विविध प्रकारच्या मालमत्ता वर्गांमधील गुंतवणुकीबद्दल वाढती रुची यांमुळे हा बदल अधिक वेगाने घडत आहे. इंडसइंड सिक्युरिटीजला समृद्ध वारसा लाभला आहे. इंडसइंड ब्रँडची ताकद आणि IIHL चे पाठबळ यांमुळे भविष्यातील विकासासाठी आम्हाला भक्कम पाया मिळाला आहे. सहज वापरता येणारे तंत्रज्ञान, सखोल आणि उपयुक्त संशोधन तसेच वैयक्तिक गरजांनुसार दिल्या जाणाऱ्या सेवांचा संगम असलेला आधुनिक आणि ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणारा गुंतवणूक प्लॅटफॉर्म उभारण्यावर आमचा भर असेल. शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि भक्कम सुशासनाच्या आधारे आम्ही या उद्दिष्टांचा पाठपुरावा करू. त्यायोगे दीर्घकालीन विकासासाठी सक्षम असा व्यवसाय उभारता येईल.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 24, 2026

October 23, 2026

October 23, 2026

October 23, 2026

October 23, 2026

October 23, 2026