पुणे, ऑक्टोबर २०२६: बजाज लाइफ इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने गिफ्ट सिटीमधील आपली पहिली ऑफर बजाज लाइफ ग्लोबल वेल्थ बिल्डर लाँच केली आहे. हे उत्पादन विशेषतः अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि जागतिक स्तरावर कार्यरत व्यक्तींना जीवन विमा संरक्षणासोबत आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे उत्पादन ग्राहकांना विविध जागतिक फंड्स आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड्सच्या (ईटीएफ) माध्यमातून अमेरिकन डॉलर्समध्ये संपत्तीचा निधी निर्माण करण्यास सक्षम करते.
या लाँचबाबत मत व्यक्त करत बजाज लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. तरुण चुघ म्हणाले, “आज ग्राहकांना जागतिक गुंतवणुकीच्या अधिक संधी उपलब्ध आहेत आणि संपत्ती निर्मिती व आर्थिक संरक्षण या दोन्ही गरजा पूर्ण करणाऱ्या सोल्युशन्सची आवश्यकता आहे. ग्लोबल वेल्थ बिल्डरच्या माध्यमातून आम्ही गिफ्ट सिटीद्वारे आमच्या ऑफर्सचा विस्तार करत आहोत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून अमेरिकन डॉलर्समध्ये संपत्ती निर्माण करणे शक्य होईल.”
बजाज लाइफ ग्लोबल वेल्थ बिल्डरची प्रमुख वैशिष्ट्ये
- जागतिक गुंतवणुकीच्या संधी: जागतिक पातळीवरील वैविध्यपूर्ण इक्विटी, उदयोन्मुख बाजारपेठेतील इक्विटी, सोने, लिक्विड फंड्स, एआय अपॉर्च्युनिटीज इक्विटी फंड आणि ग्लोबल प्युअर स्टॉक इक्विटी फंड या सहा फंड्समध्ये प्रवेश उपलब्ध करून देते, ज्यामुळे ग्राहकांना विविध क्षेत्रांमधील आणि मालमत्ता वर्गांमधील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करता येते.
- अमेरिकन डॉलर्समध्ये संपत्ती निर्मिती: ग्राहकांना अमेरिकन डॉलर्समध्ये प्रीमियम भरण्याची आणि परतावा मिळवण्याची सुविधा देते, ज्यामुळे त्यांना आपली गुंतवणूक आणि आर्थिक उद्दिष्टे एकाच चलनात ठेवण्यास मदत होते व पर्यायाने चलनातील चढ-उताराचा धोका कमी होतो.
- गुंतवणुकीतील स्थिरता: लागू असलेल्या पॉलिसीच्या अटी आणि शुल्कांच्या अधीन राहून तीन पॉलिसी वर्षांनंतर अंशतः पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर पाचव्या पॉलिसी वर्षानंतर पद्धतशीर अंशतः पैसे काढण्याचा पर्याय निवडता येऊ शकतो.
- लाभ पर्यायांची निवड: संपत्ती निर्मितीपासून ते कौटुंबिक संरक्षण आणि वारसा नियोजनापर्यंतच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेल्थ, सिक्युअर आणि सिक्युअर प्लस हे तीन पर्याय देते.
- सिक्युअर प्लस – संरक्षण, उत्पन्न आणि वारसा यांचा नाविन्यपूर्ण संगम: सिक्युअर प्लस अंतर्गत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसदारांना विम्याची रक्कम मिळते, सोबत उर्वरित संपूर्ण पॉलिसी मुदतीदरम्यान एका वार्षिक प्रीमियमइतके वार्षिक उत्पन्न मिळते, तसेच मॅच्युरिटीच्या वेळी फंड व्हॅल्यू देखील देय राहते.
- स्पर्धात्मक शुल्क आणि संपत्ती वाढवणारे फायदे: या उत्पादनावर झिरो प्रीमियम अॅलोकेशन आणि पॉलिसी-अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस आहेत. तसेच, पॉलिसीच्या अटी आणि पात्रता निकषांच्या अधीन राहून हे लॉयल्टी अॅडिशन्स आणि मॅच्युरिटी बूस्टरद्वारे ग्राहकाला लाभ मिळवून देते.
- स्थिर लाभ पेआउट्स: पॉलिसीच्या अटींच्या अधीन राहून मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट्स १५ वर्षांपर्यंत कालावधीत हप्त्यांमध्ये मिळवण्याची सुविधा देते.
ग्लोबल वेल्थ बिल्डरचे लाँच ग्राहक आज कसे जगतात, कमावतात आणि नियोजन करतात याच्याशी सुसंगत अशी नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स तयार करण्यावर बजाज लाइफ इन्शुरन्सचा सातत्यपूर्ण भर असल्याचे निदर्शनास आणते. गिफ्ट सिटीमधील आपल्या प्रवेशासह कंपनी हा दृष्टिकोन जगभरातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्यांना आत्मविश्वासाने त्यांची जीवन उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ करत आहे.





