पुणे : स्तनाच्या कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त आणि दसऱ्याचे औचित्य साधून रुबी हॉल क्लिनिकतर्फे स्तनाच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या २० रुग्णांसाठी गरबा आणि दांडिया नाइटचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून रुग्णांना संगीत, नृत्य आणि आनंदाच्या माध्यमातून सण साजरा करण्याची संधी मिळाली.
स्तनविकार शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा माने, वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. रेश्मा पूर्णिक, डॉ. रुचिता बोहिर आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे आयोजन केले. उपचारांसोबत भावनिक आधार आणि सकारात्मकता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी रुग्णांनी एकत्रितपणे आकाशकंदील सोडून आशा, एकजूट आणि नव्या उमेदेचा संदेश दिला.यावेळी रोटरी क्लब, पुणेचे पोस्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विवेक आरान्हा आणि रोटरी क्लब, पुणेच्या अध्यक्षा आरती ठक्कर यांचीही उपस्थित होत्या.





