पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये ‘साई दरबार’चा भक्तिमय जागर; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By: Editor_Manas

On: Tuesday, October 13, 2026 4:10 PM

Google News
Follow Us

पुणे : श्री साई भक्त बबलु दुग्गल प्रस्तुत ‘साई दरबार’ हा साईबाबांच्या जीवनावर आधारित गीत गायन व चमत्कारांचा कार्यक्रम पुण्यातील लोकमान्य नगर येथे आयोजित लोकमान्य फेस्टिवलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला साईभक्तांसह रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात साईबाबांच्या भक्तीवरील विविध सुरेल गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच साईबाबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि चमत्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांना साईभक्तीचा अनुभव देण्यात आला. भक्तिगीतांच्या सुरांनी आणि साईबाबांच्या जीवनातील प्रसंगांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

साईबाबांच्या शिकवणीतील श्रद्धा, सबुरी, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला. साईबाबांच्या भक्तीचा प्रसार आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उपस्थित रसिकांसाठी भक्तिमय पर्वणी ठरला.

अशी माहिती लोकमान्य फेस्टिवलचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी दिली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 13, 2026

October 13, 2026

October 13, 2026

October 12, 2026

October 12, 2026

October 12, 2026