राष्ट्रीय, ऑक्टोबर ९, २०२६: खरा बिर्याणीप्रेमी चविष्ट बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी अधिक अंतर पार करू शकतो. सर्वोत्तम बिर्याणी नेहमी सोशल मीडिया फीड्सवर झळकणारी किंवा जिथे सर्वात जास्त गर्दी होते अशीच असेल असे नाही, पण ज्यासाठी व्यक्ती गल्लीबोळ पार करतात, केवळ ऐकीव माहितीच्या आधारे पोहोचतात आणि पुन्हा पुन्हा तिथेच जातात, अशी ती असते. पुढील अविस्मरणीय बिर्याणी शोधण्याच्या या आवडीवर आधारित थम्स अप आपल्या ‘तूफानी बिर्याणी हंट’च्या तिसऱ्या सीझनसह पुन्हा सज्ज झाले आहे, जे भारताचे बिर्याणीवरील प्रेम आणि बिर्याणीसोबत थम्स अपच्या अतूट जोडीचा उत्सव साजरा करण्याचा प्रवास पुढे चालू ठेवत आहे.
शेफ रणवीर ब्रार यांच्या सूत्रसंचालनाखाली, हा नवा सीझन त्यांच्या तूफानी टीमसोबत देशातील काही दुर्लक्षित स्थानिक बिर्याणींच्या मागे असलेल्या गोष्टी, चव आणि व्यक्तींचा शोध घेतो. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या रेसिपीज आणि अनेक दशके जुन्या दुकानांपासून ज्यांचे फूड स्थानिक पातळीवर अत्यंत आवडीचे बनले आहे अशा होम शेफ्सपर्यंत, हा सीझन खरा बिर्याणीप्रेमी जिथे जाईल तिथे पोहोचतो: सहज दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन, उत्सुकतेने, केवळ तोंडी मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि एका अविस्मरणीय चवीच्या आशेने. तूफानी बिर्याणी हंटच्या माध्यमातून, थम्स अप या शोध घेण्याच्या संस्कृतीचा आणि पुढील सर्वोत्तम बिर्याणी नक्की कुठे मिळेल हे अचूक माहित असणाऱ्या व्यक्तींना प्रशंसित करते.
कोका-कोला इंडिया आणि साउथ-वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंक फ्लेवर्सच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, “बिर्याणीची एक प्लेट, थंडगार थम्स अप आणि टेबलाभोवती जमलेले मित्र हे गप्पागोष्टी रंगण्यासाठी आणि नवीन साहसांची सुरुवात होण्यासाठी योग्य वातावरण तयार करतात. तूफानी बिर्याणी हंटच्या नव्या सीझनमध्ये, शेफ रणवीर ब्रार आणि त्यांचे मित्र प्रत्येक शहराची बिर्याणी संस्कृती जिवंत करणाऱ्या दुर्लक्षित ठिकाणांचा शोध घेण्यासाठी नेहमीच्या लोकप्रिय ठिकाणांच्या पलीकडे जात आहेत. प्रसिद्धीपेक्षा चवीला प्राधान्य देऊन, आम्ही अशा ठिकाणांवर प्रकाश टाकत आहोत, ज्यांनी एका वेळी एका प्लेटच्या माध्यमातून व्यक्तींचे प्रेम मिळवले आहे. दावतसोबत आमचा सहयोग दोन ब्रँड्सना एकत्र आणतो, जे बिर्याणीच्या केंद्रस्थानी आहेत, ज्यामुळे थम्स अपसोबत बिर्याणीचा आस्वाद अधिक तूफानी बनतो.”
तूफानी बिर्याणी हंटच्या या सीझनसाठी थम्स अपने पहिल्यांदाच दावतसोबत सहयोग केला आहे, ज्याद्वारे बिर्याणीबद्दल मनापासून प्रेम आणि बिर्याणीभोवती वैशिष्ट्यपूर्ण अनुभव निर्माण करण्याची कटिबद्धता असणारे दोन ब्रँड्स एकत्र आले आहेत. हा सहयोग थम्स अपचा तूफानी उत्साह आणि तांदळाच्या बाबतीत दावतचे कौशल्य एकत्र आणून कला, कथा आणि अनेक परंपरांचा गौरव करतो, ज्यामुळे बिर्याणी भारताच्या खाद्य संस्कृतीमध्ये अत्यंत लोकप्रिय बनली आहे.
एलटी फूड्स लिमिटेडचे इंडिया अँड फार ईस्टमधील चीफ मार्केटिंग ऑफिसर रितेश सूद म्हणाले, “दावतचे बिर्याणी प्रेमींशी एक सखोल आणि दीर्घकालीन नाते आहे. बिर्याणीच्या प्रसंगांचा भाग होण्यापासून या पदार्थाभोवती संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यापर्यंत व्यक्तींना एकत्र आणणे आणि बिर्याणीला खास बनवणाऱ्या अनेक परंपरा, चव व कथांना साजरा करणे हा आमचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. थम्स अपसोबत त्यांच्या तूफानी बिर्याणी हंटसाठी सहयोग करून, अस्सल बिर्याणीच्या कथा शोधणे व त्यांचा गौरव करणे आणि देशभरातील बिर्याणी प्रेमींसाठी अधिक उत्साहवर्धक अनुभव निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
तूफानी बिर्याणी हंटच्या माध्यमातून थम्स अप भारतातील व्यक्तींच्या बिर्याणीवरील प्रेमाभोवती असणारी आवड, उत्सुकता आणि संवादांचा उत्सव साजरा करणे सुरू ठेवते. हा शोध इन्स्टाग्रामवर समोर येईल, तसतसे या कथांना खाद्यविषयक संवादांच्या केंद्रस्थानी आणणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे देशभरातील बिर्याणी प्रेमींना त्यांचे पुढील आवडते बिर्याणीचे ठिकाण शोधण्याचा मार्ग मिळेल.





