फटाक्यांच्या गोदामात आगीचा भडका; हिंगोलीत दोघांचा मृत्यू, सात जखमी

By: Editor_Manas

On: Monday, October 5, 2026 4:13 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी घडली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझविण्याच्या प्रयत्नांदरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनालाही आग लागली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोदामात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आग वेगाने पसरल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

दरम्यान, बचावकार्य सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या वाहनालाही आगीची झळ बसली. त्यामुळे काही काळ बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, गोदामात फटाक्यांचा साठा कशा पद्धतीने ठेवण्यात आला होता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now