तरुणांना प्रेरणा देण्यासाठी भारतीय नौदल आणि टीव्हीएस मोटर यांची ‘फ्लीट टू फोर्ट्स’ संयुक्त मोहीम

By: Editor_Manas

On: Wednesday, September 30, 2026 6:03 PM

Google News
Follow Us

मुंबई / बेंगळुरू, 30 सप्टेंबर 2026: दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांचे नामांकित जागतिक उत्पादक असलेल्या टीव्हीएस वेणू (TVS VENU) समूहातील टीव्हीएस मोटर कंपनीच्या सहकार्याने, भारतीय नौदलाने आज मुंबईतील नेव्हीनगर येथील कोहली स्टेडियमवरून फ्लीट टू फोर्ट्स (Fleet to Forts) या मोटरसायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

14 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 1600 कि.मी.हून अधिक अंतर कापले जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित १० किल्ल्यांना भेटी दिल्या जातील; यामध्ये भारतातील मराठा लष्करी स्थापत्य (Maratha Military Landscapes of India) या नामांकनांतर्गत युनेस्कोच्या (UNESCO) वारसा यादीत नुकत्याच समाविष्ट करण्यात आलेल्या किल्ल्यांचाही समावेश आहे. तसेच, या मोहिमेद्वारे तरुणांमध्ये भारतीय नौदलातील करिअरच्या संधींविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे; यात विशेषतः अग्निपथ योजनेवर – सशस्त्र दलांमध्ये अधिकारी-पदाखालील कर्मचाऱ्यांच्या अल्प-मुदतीच्या भरतीसाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना – भर दिला जाणार आहे.

कॅप्टन शेखर देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय या तुकडीमध्ये अधिकारी, खलाशी आणि अग्निवीर यांचा समावेश आहे. यात महिला अधिकारी, महिला अग्निवीर आणि नौदल समुदायातील महिलांचाही समावेश असून, त्याद्वारे भारतीय नौदलाचा ‘नारी शक्ती’वरील भर अधोरेखित होतो. भारतीय नौदलाचे रायडर्स टीव्हीएस रोनिन (TVS Ronin) मोटारसायकलींवरून महाराष्ट्रातील अंतर्गत शहरे आणि गावांमधून जाणारा हा साहसी प्रवास पूर्ण करतील. भारतीय नौदलासोबतच्या या सहयोगामुळे, भारताचा सागरी वारसा घडवणाऱ्या भूभागातून प्रवास करत अन्वेषण, साहस आणि मैत्रीच्या कथा तरुण भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचा बहुमान ‘टीव्हीएस मोटर कंपनी’ला मिळाला आहे.

फ्लॅग-ऑफ समारंभातील भाषणादरम्यान, वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ॲडमिरल राहुल विलास गोखले यांनी सांगितले की, अथांग समुद्रात एक प्रभावी शक्ती म्हणून भारतीय नौदल कार्यरत आहे आणि या फ्लीट टू फोर्ट्स (Fleet to Forts) या मोटारसायकल मोहिमेतून नौदलाची साहसी वृत्ती, शोध घेण्याची जिद्द आणि जनसंपर्काची भावना योग्यरित्या दिसून येते. त्यांनी नमूद केले की, दूरदृष्टी, धैर्य, संघटन कौशल्य, चिकाटी आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही हे किल्ले प्रभावी लष्करी क्षमता उभारण्याच्या क्षमतेची चिरंतन प्रतीके आहेत; स्वदेशी सागरी क्षमता उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलासाठी सतत प्रेरणास्थान राहिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सहभागी रायडर्सना त्यांनी आवाहन केले की, त्यांनी तरुण भारतापर्यंत अभिमानाने राष्ट्रसेवेचा संदेश पोहोचवावा आणि महाराष्ट्राला अद्वितीय बनवणारी संस्कृती, विविध समुदाय, निसर्गसौंदर्य व वारसा यांचा अनुभव घेण्यासाठी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.

या प्रसंगी, टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम बिझनेस विभागाचे प्रमुख, श्री. विमल सुंबली म्हणाले,“‘फ्लीट टू फोर्ट्स’ या मोटरसायकल मोहिमेच्या माध्यमातून भारतीय नौदलासोबतचा आमचे सहकार्य पुढे चालू ठेवताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि सन्मान वाटतो. हा प्रवास शौर्य, चिकाटी आणि कल्पकतेच्या कथा जिवंत करतो आणि आपल्या सागरी वारशाला आकार देणाऱ्या ऐतिहासिक किल्ल्यांमधून तसेच किनारपट्टीच्या प्रदेशांमधून या प्रेरणादायी कथा तरुण भारतीयांपर्यंत पोहोचवतो. हीच भावना टीव्हीएस रोनिनमध्ये खोलवर रुजलेली आहे, जी रायडर्सना स्वतःचा मार्ग आखण्यासाठी, अनपेक्षित गोष्टींना स्वीकारण्यासाठी आणि प्रत्येक प्रवासाला स्वतःची एक कहाणी बनवण्यासाठी प्रोत्साहित करते. व्यक्तिमत्त्व आणि शोधवृत्तीवर आधारित #अनस्क्रिप्टेड जीवनशैलीद्वारे, रोनिन रायडर्सना रस्त्याचा वेगळ्या पद्धतीने अनुभव घेण्यासाठी प्रेरित करते. आम्हाला आशा आहे की, ही मोहीम नव्या पिढीला आपल्या सामायिक प्रवासाला परिभाषित करणारे धैर्य, सर्जनशीलता आणि उद्देशाची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देईल. आम्ही संपूर्ण तुकडीला सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देतो.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 30, 2026

September 30, 2026

September 30, 2026

September 30, 2026

September 30, 2026

September 30, 2026