श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

By: Editor _2

On: Wednesday, September 16, 2026 4:24 AM

Google News
Follow Us

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातातएका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!

श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत आलेली एक प्रथा आहे, की यामागे काही अध्यात्मशास्त्रीय कारण आहे? अध्यात्मशास्त्रानुसार, विशिष्ट देवतेला विशिष्ट फुले, पत्री आणि दुर्वा अर्पण केल्या जातात; कारण त्यांच्यामध्ये त्या विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते.

गोव्यातील ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या  संशोधकांनी ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’ (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर करून या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास केला. हे एक विशेष व्हिडिओ-इमेजिंग तंत्रज्ञान असून, ते वस्तू किंवा व्यक्तीभोवतीचे अदृश्य प्रभामंडळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या प्रयोगात श्री गणेशाच्या चित्रासमोर तुळस आणि दुर्वा ठेवल्यावर होणाऱ्या परिणामांची तुलना करण्यात आली.

कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी श्री गणेशाच्या चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे ‘PIP’द्वारे मूलभूत (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर श्री गणेशाच्या चित्रासमोर तुळस ठेवून दुसरे रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर दुर्वा ठेवून पुन्हा रीडिंग घेण्यात आले. याचे परिणाम चित्रात दर्शवले आहेत.

पिढ्यानपिढ्या हिंदू भाविक विशिष्ट देवतांना विशिष्ट फुले, पत्री आणि दुर्वा अर्पण करत आले आहेत. या प्रयोगात श्री गणेशाच्या चित्रासमोर  तुळस आणि दुर्वा ठेवणे याच्या परिणामात लक्षणीय फरक दिसून आला. श्री गणेशाच्या चित्रासमोर  तुळस ठेवल्यावर मूलभूत रीडिंगच्या तुलनेत सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाली, तर दुर्वा ठेवल्यावर सकारात्मक ऊर्जेच्या रीडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. अशी निरीक्षणे आपल्या पारंपरिक आध्यात्मिक पद्धती आणि त्यामागील तत्त्वांकडे अधिक बारकाईने पहाण्यास प्रोत्साहित करतात.

संशोधक गटाच्या मते, ही निरीक्षणे अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, दुर्वा या एका नैसर्गि‍क ‘एंटेना’सारखे कार्य करतात; ज्या श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असतात.

त्यामुळे सर्व साधक आणि जिज्ञासूंनो – जेव्हा तुम्ही श्री गणेशाला भावपूर्णरीत्या दुर्वा अर्पण कराल, तेव्हा हे लक्षात ठेवा की, तुम्ही गणेशतत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात ग्रहण करण्यासाठी अत्यंत पूरक असे वातावरण निर्माण करत आहात!

संशोधकांच्या मते ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे. यामागील सूक्ष्म कार्यपद्धती समजून घेतल्यास, आपण आपल्या दैनंदिन पूजाविधींमधून जास्तीत जास्त सकारात्मक स्पंदने प्राप्त करू शकतो’.

— सौमधुरा धनंजय कर्वेसंशोधन विभागमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयगोवा.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now