महिंद्राची ब्लेजो आय-टीआरके: भारतातील फायदेशीर आणि इंटेलिजंट ट्रकिंगसाठी नवीन मानक प्रस्थापित

By: Editor_Manas

On: Friday, September 4, 2026 4:59 PM

Google News
Follow Us

पुणे, सप्टेंबर २०२६ : महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या महिंद्रा ट्रक अँड बसने हेवी कमर्शियल वाहन क्षेत्रात नवे पाऊल टाकत ब्लेजो आय-टीआरके (Blazo iTRK) ही अत्याधुनिक ट्रक मालिका बाजारात सादर केली. ट्रान्सपोर्टर्स आणि फ्लीट मालकांना अधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या ट्रकचे घोषवाक्य ‘प्रॉफिट का रॉकेट’ असे आहे.

ब्लेजो आय-टीआरके ही केवळ ट्रक नसून, इंधन बचत, उच्च कार्यक्षमता, स्मार्ट कनेक्टेड तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक सेवा सुविधांनी युक्त संपूर्ण व्यावसायिक सोल्यूशन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

इंधन बचतीमुळे पाच वर्षांत १५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त नफा

ब्लेजो आय-टीआरकेमध्ये एआय-आधारित iFuelSmart Auto Drive Mode, TurboMax Turbocharger, OptiFuel Air Compressor यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे इंधन कार्यक्षमता १० टक्क्यांपर्यंत वाढते. कंपनीच्या दाव्यानुसार, या बचतीमुळे एका ट्रकवर पाच वर्षांत सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त नफा मिळू शकतो.

३२० एचपी इंजिन आणि चालकासाठी अधिक आराम

या ट्रकमध्ये महिंद्राचे ३२० एचपी MPower इंजिन देण्यात आले असून ते अधिक शक्तिशाली, विश्वासार्ह आणि उत्पादक आहे. चालकाच्या सोयीसाठी कॉम्फीमॅक्स सस्पेंडेड सीट, क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम, एसी केबिन आणि एर्गोनॉमिक डिझाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही चालकाचा थकवा कमी होऊन उत्पादकता वाढते.

उद्योगातील पहिली ४८ तासांची अपटाईम गॅरंटी

महिंद्राने ब्लेजो आय-टीआरकेसह ४८ तासांची अपटाईम गॅरंटी जाहीर केली आहे. वाहन बिघाडानंतर ४८ तासांत ते पुन्हा रस्त्यावर आणण्यात अपयश आल्यास ग्राहकाला दररोज १० हजार रुपये देण्याची हमी कंपनीने दिली आहे. याशिवाय देशभरातील विस्तृत सर्व्हिस नेटवर्क, महिंद्रा क्विक सर्व्हिस पॉइंट्स (MQSP) आणि महत्त्वाच्या सुट्या भागांच्या उपलब्धतेचीही हमी देण्यात आली आहे.

स्मार्ट फ्लीट मॅनेजमेंटसाठी iMAXX 2.0

ब्लेजो आय-टीआरकेमध्ये iMAXX 2.0 हे नेक्स्ट जनरेशन कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म देण्यात आले आहे. यामुळे वाहनाचे रिअल-टाईम ट्रॅकिंग, प्रिडिक्टिव्ह डायग्नोस्टिक्स, ड्रायव्हरच्या कामगिरीचे विश्लेषण, सर्व्हिस व्यवस्थापन आणि व्यवसायाशी संबंधित माहिती मोबाईल व डेस्कटॉपवर उपलब्ध होते.

NOW24x7 अॅपची सुविधा

ग्राहकांसाठी NOW24x7 मोबाईल अॅप सादर करण्यात आले असून, त्याद्वारे ब्रेकडाऊन सहाय्य, सर्व्हिस बुकिंग, सुट्या भागांची ऑर्डर, दुरुस्तीची मंजुरी, वाहनाचा सर्व्हिस इतिहास आणि इतर अनेक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.

‘इंटेलिकोर’ डिझाइनची पहिली झलक

ब्लेजो आय-टीआरके ही महिंद्राच्या ‘इंटेलिकोर’ डिझाइन तत्त्वज्ञानावर आधारित पहिली हेवी कमर्शियल ट्रक मालिका आहे. आकर्षक फ्रंट ग्रिल, मोठे हेडलॅम्प्स, एर्गोनॉमिक केबिन आणि स्कायलाईन ब्लू रंगामुळे या ट्रकला आधुनिक आणि दमदार लूक मिळाला आहे. ही मालिका तीन रंगांमध्ये आणि विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल.

विनोद सहाय यांचे मत

महिंद्रा ट्रक्स अँड बसेसचे अध्यक्ष आणि एसएमएल महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष विनोद सहाय म्हणाले की, *”भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता हे यशाचे नवे निकष ठरत आहेत. ब्लेजो आय-टीआरके हे इंटेलिजंट ट्रकिंगचे प्रतीक असून ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने ‘प्रॉफिट का रॉकेट’ आहे. या ट्रकमुळे पाच वर्षांत प्रति वाहन १५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त नफा मिळण्याची क्षमता आहे. तसेच उद्योगातील पहिली ४८ तासांची अपटाईम गॅरंटीही या वाहनासोबत देण्यात आली आहे.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now