वीज बिलाचा शाॅक; घरगुती विजेच्या दरात ६० पैशांपर्यंत वाढ;‘महावितरण’कडून जुलैच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू

By: Editor_Pratik

On: Thursday, August 13, 2026 3:41 AM

Google News
Follow Us

उन्हाळा सरल्यानंतर वीज बिलात दिलासा मिळण्याची अपेक्षा असतानाच महावितरणने ग्राहकांना पुन्हा झटका दिला आहे. महावितरणने जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केले असून, घरगुती ग्राहकांना प्रति युनिट १० ते ६० पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये मिळणाऱ्या वीज बिलावर याचा परिणाम होणार आहे.

ग्राहक श्रेणी                            प्रति युनिट वाढ
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक                 १० पैसे
१०० युनिटपर्यंत                             २० पैसे
१०१ ते ३०० युनिट                          ४० पैसे
३०१ ते ५०० युनिट                         ५५ पैसे
५०० युनिटपेक्षा+                           ६० पैसे

महावितरणने इ वाहनांच्या चार्जिंग केंद्रांनाही शुल्काच्या कक्षेत आणले आहे. चार्जिंग केंद्रांना दिल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट ३० पैसे इंधन समायोजन शुल्क आकारले जाईल.

उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना श्रेणीनुसार प्रति युनिट ३० ते ४५ पैसे, तर कमी दाबाच्या औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट २५ आणि ३५ पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. कमी दाबाच्या वाणिज्यिक ग्राहकांसाठी प्रति युनिट ४०, ५० आणि ६० पैसे शुल्क आकारले जाणार आहे.

महावितरणने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. यानुसार जुलै महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारले जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत ही वसुली सुरू राहील. यंदाच्या उन्हाळ्यात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. त्यामुळे जादा दराने वीज खरेदी करावी लागली.

या अतिरिक्त खर्चाची भरपाई इंधन समायोजन शुल्कातून केली जाणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार ही वसुली केली जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now