जुलै, २०२६: सण-समारंभांचा उत्साह असो की लग्नाची शान किंवा असो नेहमीची स्टाईल, अनमोल चमक हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा मित्रमंडळींसोबत ब्रंचसाठी तयार होत असाल किंवा घरातून बाहेर पडताना स्वतःच्या लूकला एक ‘फायनल टच’ द्यायचा असेल, दागिन्यांची चमक तुमचा प्रत्येक क्षण खास बनवते.
चमचमते हिरे आणि दागिन्यांप्रती भारतीयांचे गहिरे प्रेम पुरेपूर ओळखणारा, देशातील एक प्रमुख फाईन ज्वेलरी ब्रँड ‘मिआ बाए तनिष्क’ने ‘द बिग ब्लिंग फेस्ट’ची घोषणा केली आहे. हा या सीझनमधील या ब्रँडचा सर्वात मोठा फेस्टिवल आहे, जो मिआ बाए तनिष्कच्या वाटचालीत एक नवा, रोमांचक अध्याय घेऊन येत आहे.
दागिन्यांप्रती भारतीयांचे पूर्वापारपासून चालत आलेले प्रेम साजरे करण्यासाठी दरवर्षी एक उत्सव आयोजित केला जावा ही ‘द बिग ब्लिंग फेस्ट’ची संकल्पना आहे. १६ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार असलेल्या या फेस्टिवलमध्ये मिआच्या सर्वात नवीन आधुनिक कलेक्शन्सबरोबरीने तुम्हाला मिळतील आकर्षक ऑफर्स, ज्यामुळे तुमची रोजची स्टाईल देखील खास बनेल.
‘द बिग ब्लिंग फेस्ट’ दरम्यान ग्राहकांना हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंतची सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर ३०%* पर्यंतची सूट मिळेल. फक्त ४९९९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या आकर्षक गिफ्टिंग पर्यायांबरोबरीनेच, हे दागिने तुमच्या रोजच्या दागिन्यांची स्टाईल बदलण्यासाठी, एखादा खास प्रसंग साजरा करण्यासाठी किंवा एखाद्या खास व्यक्तीला भेट म्हणून देण्यासाठी अगदी साजेसे आहेत.
‘मिआ’चे दागिने ९, १४ आणि १८ कॅरेट सोन्यापासून बनवलेले असतात. त्यामुळे ते वजनाला कमी असतात, ते तुम्ही अगदी रोज देखील आरामात घालू शकता, त्यासोबतच सोन्याचे असल्यामुळे त्यांना एक शाश्वत मूल्य देखील असते. या रेन्जमध्ये इयररिंग्स, अंगठ्या, ब्रेसलेट्स, नेकलेस आणि पेंडंट्स आहेत, जे तुम्ही कोणत्याही लूकसोबत सहज मिक्स, मॅच आणि लेयर करू शकता. चांदीच्या दागिन्यांची एक शानदार रेन्ज देखील उपलब्ध आहे, म्हणूनच ‘मिआ’ची सिग्नेचर मॉडर्न डिझाईन्स अजून जास्त किफायतशीर व रोज घालता येतील अशी म्हणून लोकप्रिय झाली आहेत.
या फेस्टिवलविषयी, ‘मिआ बाए तनिष्क’ चे हेड ऑफ मार्केटिंग अँड कॅटेगरी, श्री अजय मौर्य यांनी सांगितले, “तरुणींच्या हृदयात हिऱ्याचे एक खास स्थान असते, पण तरीही गेल्या अनेक पिढ्या हिऱ्यांच्या दागिन्यांना फक्त खास प्रसंगांसाठी सांभाळून ठेवत होत्या. मिआ बाए तनिष्कमध्ये आम्ही असे मानतो की, दागिन्यांची चमक फक्त खास दिवसांपुरती मर्यादित राहता कामा नये, आमचे आधुनिक व स्टायलिश दागिने तुमच्या रोजच्या स्टाईलमध्ये सहज सामावले जाऊ शकतात. ‘द बिग ब्लिंग फेस्ट’ मध्ये आम्ही हिऱ्यांचे दागिने दररोज घालण्याच्या आवडीचा आनंद साजरा करत आहोत. ही आमच्या ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी आहे, स्वतःच्या दागिन्यांच्या कलेक्शनला अपग्रेड करण्याची, जेणेकरून ते असे दागिने निवडू शकतील, जे ते पूर्ण आत्मविश्वासाने, दररोज मिक्स-मॅच करून घालू शकतील.”
‘द बिग ब्लिंग फेस्ट’मध्ये मिआच्या नवीन कलेक्शन्समधील अंगठ्या, कानातले, ब्रेसलेट्स, नेकलेस आणि पेंडंट्स असे दागिने प्रस्तुत केले आहेत. हे दागिने सोन्यापासून बनवलेले आणि नैसर्गिक हिरे व आकर्षक जेम्सटोन्सनी सजवलेले आहेत. फेस्टिवलमध्ये प्रस्तुत आहे – ‘सनकिस्ड कलेक्शन’, मखमली, सोनेरी सूर्यकिरणांपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या, या कलेक्शनमध्ये ९ व १४ कॅरेट सोन्याचे, वजनाला कमी दागिने आहेत, यामध्ये आकर्षक, रंगीत जेम्सटोन्स आणि उन्हामध्ये रंग बदलणाऱ्या अनोख्या मीनाकारीचा वापर करण्यात आला आहे. ‘मॅनिफेस्ट कलेक्शन’ भारतातील शाही व पारंपरिक प्रतिकांना आजच्या आधुनिक फेस्टिवल ज्वेलरीच्या रूपात प्रस्तुत करते. मधमाशा आणि त्यांच्या पोळ्यापासून प्रेरित ‘बी माय व्हॅलेंटाईन कलेक्शन’ बहुउपयोगी आणि आधुनिक डिझाईन्समधून प्रेमाच्या भावनेचा आनंद साजरा करते.
या निवडक कलेक्शन्सबरोबरीनेच, ‘मिआ’ने आधुनिक जीवनशैलीच्या अनुषंगाने तयार केलेल्या, दररोज वापरता येतील अशा दागिन्यांची विस्तृत श्रेणी देखील प्रस्तुत केली आहे.
देशभरातील सर्व ‘मिआ बाए तनिष्क’ स्टोर्समध्ये १६ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ पर्यंत या शानदार ‘द बिग ब्लिंग फेस्ट’मध्ये सहभागी होऊन आपली आवडनिवड, हौस नक्की पूर्ण करा.





