महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेसतर्फे 70 लाख ट्रॅक्टर्सच्या उत्पादनाचा महत्वपूर्ण टप्पा पार

By: Editor_Manas

On: Friday, June 19, 2026 9:01 AM

Google News
Follow Us

मुंबई, 18 जून 2026 : महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि उत्पादनाच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेस (FEB) ने 70 लाख कृषी ट्रॅक्टर्सच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ही कामगिरी म्हणजे कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या आणि भारतासह जगभरातील लाखो शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून योगदान देण्याच्या महिंद्राच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारतातील मजबूत उत्पादन क्षमतेचा ठसा आणि जागतिक स्तरावरील भक्कम स्थान यांच्या बळावर, महिंद्रा FEB आपल्या उत्पादनांचे महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि स्वराज ट्रॅक्टर्स या ब्रँड्सअंतर्गत तसेच ट्रॅकस्टार आणि हिंदुस्तान या ट्रॅक्टर मालिकांची उत्पादक ग्रोमॅक्सच्या माध्यमातून विकास आणि विक्री करते. कंपनीकडे उद्योगातील सर्वाधिक व्यापक ट्रॅक्टर पोर्टफोलिओंपैकी एक असून, त्यात 350 हून अधिक मॉडेल्स आणि विविध प्रकारांचा समावेश आहे. यासोबतच ट्रॅक्टरद्वारे चालविल्या जाणाऱ्या आणि स्वयंचलित कृषी यंत्रसामग्रीची वाढती श्रेणीही उपलब्ध आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 19, 2026

June 18, 2026

June 18, 2026

June 18, 2026

June 18, 2026

June 18, 2026