राष्ट्रीय, 18 जून 2026: भारतातील अत्यंत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड आणि टाटा समूहाचा एक भाग असलेल्या ‘तनिष्क’ने, आपले ‘सोल्स इन सिंफनी’ हे अगदी नवीन नॅचरल डायमंड कलेक्शन सादर केले आहे. १००% नैसर्गिक हिरे आणि नैसर्गिक रत्नांचा वापर करून तयार केलेले हे कलेक्शन, आजच्या काळातील महिलांमधील आपुलकीचा बंध आणि मैत्रीचा अनोखा उत्सव साजरा करते. हे कलेक्शन बदलती नाती, सोबत घालवलेले क्षण आणि त्या गहिऱ्या संबंधांना दर्शवते, जे आजच्या महिलांच्या आयुष्याला एक नवा आकार देत आहेत.
नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये ग्राहकांची आवड सातत्याने वाढत आहे. तनिष्क या श्रेणीतील आपले स्थान अधिक बळकट करत आहे. त्यासाठी उत्कृष्ट कारीगरी आणि आधुनिक डिझाइन्सवर ब्रँडने आपले लक्ष केंद्रित केले आहे. सोबतच, तनिष्कच्या नैसर्गिक हिऱ्यांचे सदाबहार आकर्षण याला अधिक खास बनवते. ‘सोल्स इन सिंफनी’ हे कलेक्शन विशेषतः अशा महिलांसाठी डिझाइन केले आहे, ज्यांना प्रत्येक वातावरणात सहज शोभून दिसतील असे दागिने हवे असतात. हे दागिने रोजच्या जीवनातील क्षणांमध्ये, घरगुती कार्यक्रमांमध्ये आणि विशेष प्रसंगी सहज घालता येतात. हे कलेक्शन त्या अनमोल नात्यांचा उत्सव साजरा करते ज्यामुळे हे क्षण अर्थपूर्ण बनतात. हे कलेक्शन महिलांच्या परस्पर नात्यांमधील ऊब आणि सहजतेने प्रेरित आहे. या सुंदर भावनांना आधुनिक दागिन्यांचे रूप देण्यात आले आहे. यासाठी शालीन आकृत्या, सुटसुटीत डिझाइन्स आणि बहुउपयोगी लुक्सचा वापर केला आहे. याचा परिणाम म्हणून दागिन्यांची एक अशी अप्रतिम श्रेणी तयार झाली आहे, जी एकत्र घालवलेल्या क्षणांचा आनंद साजरा करते. हे महिलांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या अनोख्या बंधांचे कौतुक करते. तसेच, आजच्या काळात दागिने घालण्याच्या आधुनिक पद्धतींशी हे कलेक्शन तंतोतंत जुळणारे आहे.
हे कलेक्शन १८ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आले आहे. पारंपरिक कलात्मकतेची लय ही याची मुख्य प्रेरणा आहे. ही कलात्मकता आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून सादर करण्यात आली आहे. यामध्ये सहज प्रवाह, उत्कृष्ट शिल्पकला आणि रंगांचा अप्रतिम मेळ दिसून येतो.या श्रेणीमध्ये सुबक ओपनवर्क पॅटर्न्स आणि प्रवाही आकार समाविष्ट आहेत. सोबतच, यात जॉमेट्रिक फ्रेमिंग आणि नक्षीदार जाळीचे कामही पाहायला मिळते. या डिझाइन्समध्ये फुले आणि पंखांपासून प्रेरित असलेल्या कोरीव आकृत्या उठून दिसतात. हिऱ्यांच्या बारीक सेटिंग आणि धातूच्या थराथराच्या नक्षीकामामुळे ही डिझाइन्स जिवंत झाले आहेत. यामध्ये कुशन, पिअर, ओव्हल, एमराल्ड आणि राऊंड-कट असलेल्या नैसर्गिक रत्नांचा समावेश आहे. ही रत्ने प्रत्येक डिझाइनमध्ये एक आगळावेगळा उठाव आणि गतिशीलता आणतात. तनिष्कच्या पांढऱ्या नैसर्गिक हिऱ्यांना रंगीत नैसर्गिक रत्नांची जोड देण्यात आली आहे. हा मिलाप संपूर्ण कलेक्शनमध्ये एक अनोखा जिवंतपणा आणि खोली आणतो. यामुळे हिरे आणि रत्नांमधील एक उत्कृष्ट विरोधाभास आणि डोळ्यांना भरणारे विलोभनीय सौंदर्य निर्माण होते.
या कॅम्पेनच्या निमित्ताने अनन्या पांडे, सुष्मिता सेन आणि राधिका आपटे पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. या तिन्ही अभिनेत्रींचे व्यक्तिमत्त्व आणि विचार एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. आजच्या काळातील महिलांमधील परस्पर आदर, एकमेकींचा स्वीकार आणि एकत्र अनुभवलेला आनंद या नव्या नात्यांचे एक अतिशय सुंदर रूप त्या समोर आणतात. या कॅम्पेनचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी केले आहे. हा व्हिडिओ आपल्या आयुष्याशी जोडलेले जवळकीचे आणि सहजतेचे क्षण कॅमेऱ्यात कैद करतो. ‘जेव्हा महिला एकमेकींना पाठबळ देतात, तेव्हा एकत्र मिळून त्यांची चमक काही औरच असते”, या विचारसरणीचा हा अनोखा उत्सव आहे.
तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर, सुश्री पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, “तनिष्कने नेहमीच स्त्रीच्या जीवनप्रवासातील विविध पैलूंचा आदर केला आहे. बदलत्या काळासोबत तिच्या आयुष्याला अधिकाधिक समृद्ध करणाऱ्या प्रत्येक नात्याचे आम्ही कौतुक करतो. ‘सोल्स इन सिंफनी‘च्या माध्यमातून आम्हाला मैत्रिणी आणि बहिणींच्या नात्याची एक आधुनिक व्याख्या समोर आणायची होती. हे नाते कोणत्याही जुन्या रूढी-परंपरांनी नाही, तर समान विचारसरणी आणि परस्परांबद्दलच्या आदरामुळे घट्ट होते. आजच्या काळातील महिला वय, पार्श्वभूमी आणि आयुष्याचे टप्पे या सगळ्यानंतरही एकमेकींशी घट्ट जोडल्या जात आहेत. त्या असे वातावरण तयार करत आहेत जिथे प्रत्येकीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा सन्मान केला जातो आणि एकमेकींच्या यशाचा आनंद द्विगुणित केला जातो. हे कॅम्पेन मैत्रीच्या याच बदलत्या स्वरूपाची झलक दाखवते. अनन्या, सुष्मिता आणि राधिका यांनी आपल्या अभिनयाने हे नाते अतिशय जिवंत केले आहे. या तिन्ही अभिनेत्री आपापल्या परीने अस्सलपणा आणि अभिव्यक्तीचे प्रतीक आहेत. ‘जेव्हा महिला एकमेकींना पाठबळ देतात, तेव्हा एकत्र मिळून त्यांची चमक अधिक जास्त असते‘, याच विचाराचा गौरव आम्ही करत आहोत.”
तनिष्कचे ‘सोल्स इन सिंफनी’ हे नॅचरल डायमंड कलेक्शन तनिष्कच्या सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. हे कलेक्शन तुम्ही ऑनलाइनही खरेदी करू शकता. या श्रेणीमध्ये हिऱ्यांचे असे दागिने आहेत जे तुम्ही रोज, अगदी सहज वापरू शकाल. तसेच, खास क्षणांसाठी आणि उत्सवांसाठीही अतिशय आकर्षक दागिने यामध्ये आहेत.





