आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

By: Editor_Manas

On: Wednesday, June 17, 2026 4:19 PM

Google News
Follow Us

पुणे, महाराष्ट्र, जून १७, २०२६: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे.

आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील.

एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो.

या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल.

या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026