पुणे, जून, 2026: एका मोबिलिटी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने पुण्यातील चाकण येथील आपल्या अत्याधुनिक उत्पादन कारखान्यातून १०००व्या स्मॉल कमर्शियल वेईकल (एससीव्ही)चे यशस्वी प्रस्थान केल्याची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक टप्पा एका मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे, जे भारताच्या शाश्वत आणि शून्य-उत्सर्जन शहरी लॉजिस्टिकच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. भारत सरकारच्या ऑटो पीएलआय योजनेची चॅम्पियन ओईएम असलेली ही कंपनी व्हीडीएल ग्रुप (नेदरलँड्स), मित्सुई अँड कंपनी (जपान), एनआयआयएफ इंडिया-जपान फंड आणि इनाम होल्डिंग्सद्वारे समर्थित आहे.
१००० वी वेईकल एका 6S पुण्यातील सामाजिक आणि जनकल्याणाच्या कामांसाठी अत्यंत आदराने नाव घेतले जाणाऱ्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आली. एका 6S भारतातील पहिली स्टीअरिंग-व्हील असलेली पॅसेंजर इलेक्ट्रिक तीन-चाकी आहे, यामध्ये चालक + ६ प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या एका 6Sचा वापर आपल्या समाजसेवा कार्यात करणार असून श्रद्धा, सेवा आणि शाश्वत प्रगतीचा हा एक उत्तम संगम आहे.
या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण प्रसंगी, ईका मोबिलिटीने आपली एका 3S इलेक्ट्रिक तीन-चाकी किंगडम ऑफ नेदरलँड्सच्या भारतातील माननीय राजदूत (ॲम्बेसेडर) एच.ई. मारिसा गेरार्ड्स यांच्याकडे सुपूर्द केली. हा महत्त्वाचा टप्पा ईका मोबिलिटीचे विस्तारत असलेले जागतिक सहकार्य अधोरेखित कर आणि हरित व शाश्वत शहरी वाहतुकीच्या दिशेने प्रवासाला गती देण्याच्या भारत आणि नेदरलँड्सच्या सामायिक कटिबद्धतेला सादर करतो. नेदरलँड्स हा शाश्वत वाहतूक धोरणांमध्ये बऱ्याच काळापासून जागतिक स्तरावर अग्रेसर देश राहिलेला आहे, तसेच एका मोबिलिटीची धोरणात्मक भागीदार कंपनी व्हीडीएल ग्रुपचे मुख्यालय देखील नेदरलँड्समध्ये आहे. हे प्रतीकात्मक हस्तांतरण समान मूल्ये आणि शून्य-उत्सर्जन भविष्यासाठी असलेल्या सामायिक दृष्टिकोनाला सादर करते.
एका मोबिलिटीचे एससीव्ही आणि ट्रक उत्पादनाचे हब असलेल्या चाकण कारखान्याने स्थापनेपासून आपल्या कामकाजाचा वेगाने विस्तार केला आहे. दरवर्षी २४,००० व्यावसायिक वाहने उत्पादित करण्याची क्षमता असलेल्या या कारखान्यात १,००० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच येथे एक अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्र आहे, ज्यामध्ये ४०० पेक्षा जास्त अभियंते आणि डिझायनर्स कार्यरत आहेत. आपल्या इव्होल्युशनारी या विशेष उपक्रमांतर्गत, एका मोबिलिटीने आपल्या एससीव्ही वेईकल्ससाठी पूर्णपणे महिलांद्वारे चालवली जाणारी असेंब्ली लाईन सुरू केली आहे. हे पाऊल महिला सक्षमीकरणासाठी आणि उत्पादन क्षेत्रात अधिक सर्वसमावेशक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कंपनीच्या असलेल्या कटिबद्धतेला सादर करते. हा महत्त्वाचा टप्पा अशा वेळी गाठला गेला आहे, जेव्हा भारतात प्रवासी वाहतूक, ई-कॉमर्स, एफएमसीजी वितरण आणि लास्ट-माईल लॉजिस्टिकमध्ये इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्सचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
या प्रसंगी मत व्यक्त करत एका मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “आमच्या चाकण कारखान्यातून १००० व्या एससीव्हीचे प्रस्थान होणे, ही फक्त उत्पादनाची एक संख्या नाही; तर भारतीय अभियांत्रिकी, नाविन्यता आणि दृढनिश्चय काय साध्य करू शकतात याचा हा पुरावा आहे. यामधून आपले अनेक वर्षांचे परिश्रम आणि सामायिक विश्वास दिसून येतो की, भारतात डिझाइन आणि उत्पादित केलेल्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांद्वारे भारत शाश्वत वाहतूक क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर देश म्हणून उदयास येऊ शकतो. आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा टप्पा साजरा करत असताना, आम्हाला जाणीव आहे की आमचा उद्देश फक्त वाहने तयार करण्यापुरता मर्यादित नाही. आम्ही सर्वोत्तम सोल्यूशन्स तयार करत आहोत, जी व्यवसायांना अधिक शाश्वतपणे काम करण्यास, पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यास, दैनंदिन वाहतूक सुधारण्यास आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ भविष्य निर्माण करण्यास मदत करतील.”
“आमचे सर्व उत्पादन कारखाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, स्मार्ट आणि वेगाने विस्तार करण्याची क्षमता असलेले आहेत. भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांची बाजारपेठ गती घेत आहे, तसे विश्वासार्ह आणि शून्य-उत्सर्जन वेईकल्स शोधणाऱ्या व्यावसा…





