“ऐकावं ते नवलच; पती ने दिले पत्नीला हेलिकॉप्टर भेट”

By: Editor_Manas

On: Friday, June 5, 2026 6:40 PM

Google News
Follow Us

केडगाव : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी आपल्या पत्नी आणि जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी पत्नीला खासगी हेलिकॉप्टर भेट दिले असून, त्यामुळे कोतकर कुटुंबाच्या वाहन ताफ्यात आता हेलिकॉप्टरचीही भर पडली आहे.

केडगावात हेलिकॉप्टरचे आगमन

हेलिकॉप्टरच्या स्वागतासाठी केडगाव येथे विशेष हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. हेलिकॉप्टर केडगावात दाखल होताच भानुदास आणि सुरेखा कोतकर यांनी त्याची विधिवत पूजा केली. या अनोख्या सोहळ्याची परिसरात मोठी चर्चा रंगली.

देवस्थानांवर पुष्पवृष्टी

पूजेनंतर हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेत केडगाव येथील रेणुका माता मंदिर, नगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती मंदिर तसेच माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

अनेक वर्षांचे स्वप्न झाले साकार

कोतकर कुटुंबाचे स्वतःचे हेलिकॉप्टर असावे, हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न आज पूर्ण झाल्याची भावना उद्योजक सचिन कोतकर यांनी व्यक्त केली. यासोबतच भविष्यात खासगी हेलिकॉप्टर सेवा कंपनी सुरू करण्याचा आणि अत्याधुनिक हेलिपॅड उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

हॉटेल व्यवसायातील यशस्वी वाटचाल

केडगावच्या कोतकर कुटुंबाने हॉटेल व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ‘संदीप हॉटेल’ ब्रँडला विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भानुदास कोतकर यांचे तिन्ही पुत्र हॉटेल व्यवसायाची जबाबदारी सांभाळत असून, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर पुण्यातील हॉटेल व्यवसायात आघाडीवर आहेत.

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे कोतकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 5, 2026

June 5, 2026

June 5, 2026

June 5, 2026

June 5, 2026

June 5, 2026