पुणे, जून २०२६: भारताच्या प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाने आणि भारतीय डॉक्टरांच्या कौशल्याने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला थक्क केले आहे. प्रख्यात हृदय शल्यचिकित्सक डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी गयानामध्ये बसून भारतातील इंदूर येथे असलेल्या रुग्णाच्या हृदयावर यशस्वी रोबोटिक टेली-सर्जरी करून वैद्यकीय इतिहासात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. सुमारे २०,००० किलोमीटर अंतरावरून करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया जगातील आतापर्यंतची सर्वात लांब अंतरावरील रोबोट-सहाय्यित हृदय टेली-सर्जरी मानली जात आहे.
ही ऐतिहासिक प्रक्रिया गयानातील जॉर्जटाउन पब्लिक हॉस्पिटल कॉर्पोरेशन (GPHC) आणि भारतातील IRCAD इंडिया, इंदूर यांच्यामध्ये यशस्वीपणे पार पडली.या यशाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेल्या एसएसआय मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टम च्या सहाय्याने करण्यात आली.
डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी गयानामध्ये असलेल्या SSI MantrAsana Tele-Surgeon Console वरून शस्त्रक्रिया नियंत्रित केली, तर रुग्ण इंदूर येथील IRCAD इंडिया येथे उपस्थित होता. रोबोटिक आर्म्सनी डॉक्टरांच्या हातांच्या हालचालींची रिअल-टाइममध्ये अचूक पुनरावृत्ती करत हृदयावरील गुंतागुंतीची Left Internal Mammary Artery (LIMA) Takedown प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
सुमारे २९० ते ३०० मिलीसेकंद नेटवर्क लेटन्सी असूनही संपूर्ण शस्त्रक्रिया अत्यंत अचूकता आणि स्थिरतेने पार पडली. या प्रक्रियेदरम्यान भारतात मणिपाल हॉस्पिटल, जयपूर येथील मुख्य हृदय शल्यचिकित्सक डॉ. ललित मलिक हे टेबल-साइड सर्जन म्हणून उपस्थित होते.
डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले – जगातील कोणत्याही रुग्णापर्यंत पोहोचेल तज्ज्ञता,या ऐतिहासिक यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना एसएस इनोवेशन्स इंटरनॅशनल इंक.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले, “२०,००० किलोमीटरच्या विक्रमी अंतरावरून यशस्वीरीत्या करण्यात आलेली ही हृदय टेली-सर्जरी हे सिद्ध करते की भविष्यात जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या रुग्णापर्यंत सर्वोत्तम शस्त्रक्रिया तज्ज्ञता पोहोचवता येईल. आमचे ध्येय जागतिक दर्जाची शस्त्रक्रिया प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आहे.”





