पुणे २ जून २०२६ : देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड २०२६ परीक्षेत पुण्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फिजिक्सवाला (PW) या शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी नोंदवत यशाचा झेंडा फडकावला आहे.पुण्यातील सार्थक पलई याने अखिल भारतीय स्तरावर २०९१ वा क्रमांक, तर आयुष संजय जाधव याने १९८४ वा क्रमांक मिळवत विशेष यश संपादन केले.
भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा जेईई अॅडव्हान्स्ड २०२६ च्या दोन्ही पेपरसाठी देशभरातून १ लाख ७९ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५६ हजार ८८० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या या तीव्र वाताव.रणात पुण्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
याबाबत फिजिक्सवालाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “जेईई अॅडव्हान्स्ड”





