हरित क्रांतीतून आदिवासी महिलांना नवे बळ; गडचिरोलीत २०० महिलांना रोजगार

By: Editor_Pratik

On: Friday, May 29, 2026 4:46 AM

Google News
Follow Us

“‘हरियाली का संकल्प’ उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबत ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण”

गडचिरोली : पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण रोजगार यांचा सुंदर संगम घडवणारा “हरियाली का संकल्प – प्रकृती आणि प्रगतीसोबत” हा उपक्रम सध्या गडचिरोली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड
आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे २०० ग्रामीण व आदिवासी महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

या उपक्रमांतर्गत सुमारे २५ एकर क्षेत्रावर भव्य रोपवाटिका विकसित करण्यात आली असून येथे तब्बल ५ लाख रोपांची निर्मिती क्षमता उभारण्यात आली आहे. वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढविण्याबरोबरच स्थानिक नागरिकांसाठी शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे.

या रोपवाटिकेमध्ये महिलांना बी पेरणी, रोप निर्मिती, माती तयार करणे, कंपोस्टिंग, पॉलीबॅग तयार करणे तसेच ग्राफ्टिंग आणि कटिंगसारख्या वनस्पती संवर्धन तंत्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे महिलांना रोजगारासोबत कौशल्य विकासाची संधीही मिळत आहे.

एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना २०२० मध्ये नीतू जोशी यांनी केली होती. ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती आणि सामुदायिक कल्याणासाठी ही संस्था विशेषतः आदिवासी व दुर्गम भागात कार्यरत आहे.

संस्थेच्या संस्थापक नीतू जोशी म्हणाल्या, “माझ्या जीवनाचे उद्दिष्ट माणसे आणि प्राण्यांची सेवा करणे आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी माझ्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत असते.”

या प्रकल्पामुळे परिसरात हरित क्षेत्र वाढ, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि पर्यावरणपूरक विकासाला मोठी चालना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकासाचा आदर्श संगम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 30, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026