कॅसाग्रँडने पुण्यात एक वर्ष पूर्ण केले असून पुढील विस्ताराची योजना आखली

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 3:50 PM

Google News
Follow Us

पुणे, 19 मे 2026: आघाडीची रिअल इस्टेट कंपनी कॅसाग्रँडने पुण्यातील आपल्या कामकाजाचे एक वर्ष पूर्ण केले असून, पश्चिम भारतातील विस्ताराच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 2025 मध्ये पुणे बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर कंपनीने अप्पर खराडी जवळ ‘कॅसाग्रँड कॅलॅडियम’ हा प्रकल्प सुरू करून शहरात मजबूत ओळख निर्माण केली आहे. या प्रकल्पाद्वारे शहराच्या सातत्याने विकसित होत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्रात प्रशस्त घरे, आधुनिक सुविधा आणि उत्तम जीवनशैली देणारे निवासी प्रकल्प उभारण्यावर कंपनीचा भर असल्याचे दिसून येते. पहिल्याच वर्षात या प्रकल्पातील अनेक फ्लॅट्स विकले गेले आहेत.

या खास निमित्ताने कॅसाग्रँडने विशेष वर्धापनदिन ऑफरही जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत घरखरेदीदारांना 2 बीएचके फ्लॅट खरेदीवर 7.5 लाखांपर्यंत आणि 3 बीएचके फ्लॅट खरेदीवर 10 लाखांपर्यंत सूट मिळणार आहे.

2.8 एकर परिसरात उभारलेला ‘कॅसाग्रँड कॅलॅडियम’ हा सिंगापूर-शैलीतील आर्किटेक्चरवर आधारित प्रीमियम निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात 334 प्रशस्त आणि आकर्षक डिझाइन केलेले 2 आणि 3 बीएचके फ्लॅट्स आहेत. आधुनिक शहरी जीवनशैली लक्षात घेऊन येथे 110 हून अधिक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 1,800 चौ. फूट रूफटॉप इन्फिनिटी पूल, 13,500 चौ. फूट क्लब हाऊस, तसेच फिटनेस, क्रीडा, मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा समाविष्ट आहेत. या प्रकल्पात 2 एकर मोकळी जागा असून, 30,000 चौ. फूट हिरवळ जागा विकसित करण्यात आली आहे, ज्यामुळे रहिवाशांना शांत आणि ताजेतवाने वातावरण मिळते. अप्पर खराडीजवळील वेगाने विकसित होणाऱ्या निवासी भागात हा प्रकल्प असल्यामुळे आयटी हब, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि व्यावसायिक भागांशी उत्तम संपर्क मिळतो. त्यामुळे आधुनिक घरखरेदीदारांकडून या प्रकल्पाला चांगली पसंती मिळत आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या साइटवर बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे.

पुण्यात एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅसाग्रँडने ‘कॅसाग्रँड कॅलॅडियम’ येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला कॅसाग्रँडचे पुणे विभागाचे डायरेक्टर जगमोहन टी आणि कंपनीचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याच्या खास पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. पाहुण्यांसाठी खास फेटा बांधण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पुण्यातील कंपनीच्या एका वर्षाच्या प्रवासाचा खास व्हिडिओ दाखवण्यात आला आणि इतर अनेक आकर्षक उपक्रमही आयोजित करण्यात आले.

या यशाबद्दल बोलताना जगमोहन टी, डायरेक्टर – पुणे झोन, कॅसाग्रँड म्हणाले, “पुण्यातील आमचे पहिले वर्ष यशस्वीपणे पूर्ण होणे हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण यामुळे दक्षिण भारताबाहेरील बाजारपेठेत आमची मजबूत सुरुवात झाली आहे. गेल्या 22 वर्षांत आम्ही घरखरेदीदारांमध्ये विश्वासार्ह आणि यशस्वी डेव्हलपर म्हणून ओळख निर्माण केली आहे आणि विविध भागांमध्ये झालेली आमची वाढ ही त्याचीच साक्ष आहे. त्याचप्रमाणे, पुणे हे आमच्या वाढीच्या प्रवासातील एक महत्त्वाचे बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. दर्जेदार घरे आणि उत्तम जीवनशैली देण्यावर आमचा कायम भर राहणार आहे. आमच्या प्रकल्पांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि येत्या काही वर्षांत पुणे तसेच पश्चिम भारतातील बाजारपेठेत आमची उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा आमचा मानस आहे.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now